Monday, June 5, 2023
Home कंधार भयमुक्त लोहा-कंधारसाठी दडपशाहीविरूद्ध संघर्ष करा – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आवाहन -NNL

भयमुक्त लोहा-कंधारसाठी दडपशाहीविरूद्ध संघर्ष करा – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आवाहन -NNL

लोहा तालुक्यातील शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

by nandednewslive
0 comment

नांदेड| कंधार- लोहा तालुक्यात दारु व रेती माफियांचे प्राबल्य सतत वाढतेच आहे. यातून मिळणार्‍या पैशाचा वापर करत या भागातील कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करुन सत्ता काबिज करण्याचे प्रयत्न केले जातात. दडपशाही केली जाते. या भागात भयमुक्त वातावरण निर्मितीसाठी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आपली ताकद दाखवावी आणि संघर्ष करावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

लोहा तालुक्यातील मारतळा, कांजाळा, कांजाळावाडी, डोलारा, धनज बु., गोळेगाव, जोमेगाव, कारेगाव, येळी येथील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आ. ईश्वरराव भोसीकर हे होते. तर यावेळी व्यासपीठावर आ. मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अनिल मोरे, प्रवक्ते संतोष पांडागळे, लोहा तालुकाध्यक्ष शरद पवार, कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, जिल्हा सचिव भास्करराव पाटील जोमेगावकर, शहराध्यक्ष वसंत पवार,नागोराव पाटील आलेगावकर, उत्तम पाटील वडवळे, राम सोनसळे, माधव डोंम्पले यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपसह विविध पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना चव्हाण पुढे म्हणाले की, तुम्हा सर्वांचा काँग्रेस प्रवेश म्हणजे ‘देर आए मगर दुरुस्त आए’ असा आहे. तुमच्या खांद्यावर आलेली काँग्रेसची दस्ती मरेपर्यंत काढू नका. पुन्हा दस्ती बदलू नका. तुमच्याशिवाय मतदारसंघात काहीच होवू शकत नाही. हे विरोधकांना दाखवून द्या. काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून आणा. या दोन्ही तालुक्यात मोठी दहशत आहे. वेगवेगळ्या मार्गाने कार्यकर्त्यांना अडचणीत आणून त्यांना सोबत ठेवण्याचे काम काहीजण करत आहेत.

परंतु आज ज्या मोठ्या संख्येने हिंम्मत दाखवून कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे व जुने कार्यकर्ते या सर्वांच्या सुख-दु:खात मी राहीन, असा विश्वास देतांनाच विधानसभा लोकसभेच्या आधी येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत गट-तटाचे राजकारण न करता जास्तीत जास्त काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना निवडून आणा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी आ. मोहनअण्णा हंबर्डे, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, संतोष पांडागळे, शरद पवार, भास्करराव पाटील जोमेगावकर यांची समयोचित भाषणे झाली. सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार संतोष देवराये यांनी मानले.

या कार्यक्रमाला रामराव ढेपे, उध्दव ढेपे, हणमंत डापरवाड, भीमराव लांडगे, नवनाथ ढेपे, तिरुपती ढेपे, संतोष गजभारे, तिरुपती येडे, विलास येडे, शहाबुद्दीन शेख, सोनाजी गजभारे, प्रमोद गजभारे, माधव ढेपे, सादीक शेख, दत्ता येडे, पवन ढेपे, नागोराव मळगदे, रमाकांत कांबळे, प्रताप मळगदे, नारायण भोंग, सचिन भागानगरे, कामाजी लोहकरे, सचिन लोहकरे, शिवाजी भागानगरे, बालाजी मळगदे, व्यंकटी मळगदे, नागोराव भोंग, विजय कांबळे, मोबीन तांबोळी, मारोती भोंग, बळीराम लोहकरे, साईनाथ भागानगरे, तिरुपती भोंग, संभाजी लोहकरे,

स्वप्नील भोंग, नागेश भागानगरे, किसन लोहकरे, गणेश लोहकरे, अविनाश गायकवाड, तिरुपती ढाले, रामेश्वर लोहकरे, शिवानंद भोंग, अविनाश लोहकरे, दत्ता सालेगावे, शुभम सालेगावे, उत्तम मरवाळे, अनिल सुताडे, माधव घागरे, अविनाश घागरे, नारायण गिरी, भय्यासाहेब वाघमारे, सुनिल पवार, शुभम भुरे, सुशिल भुरे, अनिल गव्हाणे, गणेश मुंडकर, माधव वैजाळे, लक्ष्मण गाडे, गुणाजी शिंदे, संभाजी शिंदे, बालाजी भुरे, संभाजी ढाले, बसवेश्वर शिराळे, शिवाजी मोरे, आनंदा शिंदे, शिवाजी कपाळे, संदीप शिराळे, हनमंत कदम, विठ्ठल शिराळे, गोविंद दुगावे, नितीन सुर्यवंशी, बादल कांबळे, आयर्न पेटकर, नागेश बस्वदे, पवन डोंम्पले, राज कांबळे, नितीन बसवंते, गजानन देशमुख, ज्ञानेश्वर राठोड, विपराज गायकवाड आदींनी यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

शरद पवार, संतोष पांडागळे, भास्कर जोमेगावकर यांचा पुढाकार – लोहा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणण्यासाठी लोह्याचे तालुकाध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे, जिल्हा सचिव भास्करराव पाटील जोमेगावकर यांनी पुढाकार घेतला होता.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!