
नविन नांदेड| श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित सिडको येथील इंदिरा गांधी महाविद्यालयात दि.१७ जानेवारी रोजी सकाळी ११ वा.प्रादेशिक परिवहन विभाग नांदेड तर्फे ३४ व्या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र माळी हे होते तर व्यासपीठावर प्रादेशिक विभागाचे परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भरत गायकवाड, सुनील झारलवार, पर्यवेक्षक प्रा. यू. सी. चंदेल यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. राजेंद्र माळी यांनी आजच्या नवतरुण विद्यार्थ्यांनी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी परिवहन विभागा तर्फे जी काही शासकीय नियमावली लागू केली आहे.


त्या नियमावलीचे काटेकोरपने पालन करुन स्वतः विद्यार्थ्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. तसेच आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून शाळा महाविद्यालया जवळ वाहनाची गती कमी केली पाहिजे. व आपण सर्वांनी वाहनाची वेळोवेळी तपासणी करून नियमित सर्विसिंग केली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना परिवहन विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर सुनील झारलावार म्हणाले की रात्रीचा प्रवास टाळावा,आरटीओ चे सर्व नियम पाळावेत, वाहन चालवताना कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, ट्राफिक संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले पाहिजे.


नवतरुण विद्यार्थ्यांमध्ये अपघात टाळण्यासाठी जनजागृती खूप मोठ्या प्रमाणात केली पाहिजे असे आपल्या प्रास्ताविका त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून परिवहन खात्याचे भरत गायकवाड म्हणाले की प्रत्येक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी स्वतःची सुरक्षा स्वतःच केली पाहिजे. कारण आपली सुरक्षा आपल्या हातातच असते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्रा.डॉ. रमेश नांदेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.शशीकांत हाटकर यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
