Monday, February 6, 2023
Home महाराष्ट्र गृहरक्षक दलाच्या जखमी जवानास २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान -NNL

गृहरक्षक दलाच्या जखमी जवानास २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान -NNL

by nandednewslive
0 comment

मुंबई| खालापूर (जि. रायगड) पोलीस ठाणेअंतर्गत दरोडा प्रतिबंधक पथकात कर्तव्यावर कार्यरत गृहरक्षक दलाचे जवान लक्ष्मण विठ्ठल आखाडे यांचा मुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावर ५ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री दीड वाजता अपघात झाला. या अपघातात त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झाले. त्यांना एचडीएफसी बँकेतर्फे विमा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या २५ लाख रुपये रकमेचा धनादेश गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

गृहरक्षक दलाच्या जवानांना विमा संरक्षण प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्रातील ४६ हजार ३३४ जवानांचे बचत खाते उघडून त्यांना विमा संरक्षण व अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. श्री. आखाडे यांना कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झाल्याने मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार त्यांना मदतीचा धनादेश अनुज्ञेय झाला.

यावेळी अपर पोलीस महासंचालक तथा गृहरक्षक दलाचे उपमहासमादेशक ब्रिजेश सिंह, रायगडचे अपर पोलीस अधीक्षक तथा गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक अतुल उत्तमराव झेंडे, एचडीएफसी बँकेचे संदीप कोचर, क्लेम सेटलमेंट व्यवस्थापक मंजरी सावंत आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!