
हदगाव/नांदेड।येथील नवोदय क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ श्याम दवणे यांनी हदगाव तालुक्यातील गुरफळी येथे भव्य आरोग्य शिबिर घेवून रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधोपचार दिले. दिनांक 12 जानेवारी राजी राष्ट्रमाता मॉ जिजाऊ साहेब यांची जयंती व डॉ. श्याम गोविंदराव दवणे यांची कन्या कु. जिजाऊ दवेणे हिच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकरी जपत हा उपक्रम त्यांच्या गावी घेतला.


या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी, मोफत शस्त्रक्रिया, बीपी, शुगर, रक्तातील चरबीचे प्रमाण व इतर आरोग्य विषयक मोफत तपासणी करण्यात आली. माजी सभापती शामरावजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. श्याम गोविंदराव दवणे यांच्या हस्ते करण्यात आले.


या शिबिरात विविध आराजाच्या 530 रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधी देण्यात आली. यात 108 लोकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला. यात तीस रुग्णाचे मोतीबिंदूचे ऑपरेशन येत्या 6 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होणार आहे. त्यांचा सर्व खर्च डॉ. श्याम दवणे उचलणार आहेत. यावेळी डॉ. नितीन वाघमारे, डॉ. पवन पेटकर, डॉ. विशाल चित्तेवार, डॉ. श्याम दवणे, डॉ. मोरे, डॉ. निलेश भालेराव आदींनी रुग्णांची तपासणी केली.


कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी आनंदा दवणे, संदीप दवणे, माजी सरपंच दिलीप पवार, शामराव पवार, ज्ञानेश्वर कदम, विश्वजीत पवार, निरोजी कदम, संजय दवणे आदींनी पुढाकार घेतला.
