
हदगाव, शे.चांदपाशा| आमच्या उमेदवाराला मतदान का..? केलं नाही म्हणून बेदम माराहाण करण्यात आल्याने नऊ जणावर अट्राँसिटी अंतर्गत हदगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना हदगाव तालुक्यातील मनुला या गावी घडली आहे.


या बाबतीत माहीती अशी की, गजानन भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि १६ जानेवारी २०२३ रोजी मी माझ्या घरा समोर बसलो. यावेळी गावातील नऊ जणांनी मला “तु आमच्या उमेदवाराला मतदान केलं नसल्यामूळे आमचा उमदेवार पडला. म्हणून अत्यंत हिनशब्दात व आश्लिल भाषेत घाणेरड्या व जातिवाचक शिवीगाळ केली.


तसेच तु लय माजालास म्हणून सर्वजणांनी मारण्यास सुरुवात केली. एकाने लोखडी राँडने डोक्यावर मारल्यामुळे मी जख्मी झालो. या अवस्थेतच सर्व घटना पोलिसांना सागितली. यावरुन हदगाव पोलिसांनी अविनाष जाधव, गजानन जाधव, संदीप जाधव, हरिभाऊ कदम, किरण जाधवसह नऊ जणांवर हदगाव पोलिस स्टेशन मध्ये गु.र. क्र १५/२३ कलम ३०७,१४३, १८८,१४४,१४७,१४८ व १४९ कलमान्वे अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस निरक्षक जगनाथ पवार पुढील तपास करित आहेत.

