
उस्माननगर। येथील सिध्दार्थ ऐज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक राहुल सोनसळे व सहशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच चाकुर येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी शाळेतील मुलांनी सहलीतुन आनंद व अनुभव घेतला.

जिल्हा परिषदे शिक्षण विभागाच्या आदेशानुसार सम्राट अशोक प्राथमिक शाळा उस्माननगर ता.कंधार येथील सातवी पर्यंतच्या मुला मुलींची सहलीचे आयोजन मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि.१७ जानेवारी रोजी चाकुर येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी सहलीचे आयोजन केले होते. येथील विविध प्रकारचे उपक्रम , छोटे, मोठे खेळणे पाहून , मौजमजा करून, चाकुर येथील निसर्गसौंदर्य पाहुण विद्यार्थ्यानी आनंद व अनुभव घेतला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे,मन्मथ केसे, देविदास डांगे, भगवान राक्षसमारे, नितिन लाटकर,शखिल शेख ,समता जोंधळे,रोहिणी सोनकांबळे ,मणिषा भालेराव, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व सहल यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

