
नांदेड,अनिल मादसवार| आमदार विक्रम काळे शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने ते सभागृहात मांडत असतात. त्यांच्यासोबत सन 2008 पासून मी विधी मंडळात काम करत आहे. सरकार आपले असो की विरोधी पक्षाचे असो शिक्षकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच आक्रम भूमिका घेतली आहे. आ.विक्रम काळे यांना शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तम जाण असून त्यांना पुन्हा विधी मंडळात काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केले.


औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 30 जानेवारी 2023 रोजी होत आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ आज दि.18 माहूर, हदगाव, हिमायतनगर, भोकर तालुक्यात आ.सतीश चव्हाण यांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. हदगाव येथील पंचशील विद्यार्जन हायस्कूल येथे आयोजित सभेत बोलताना आ.सतीश चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आम्ही शासनस्तरावर जोमाने पाठपूरावा सुरू केला.


मात्र कोरोनासारख्या नव्या संकटाला सरकारला सामोरे जावे लागले. मात्र अशाही परिस्थितीत 23 जून 2022 रोजी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यासकडे आम्ही शाळा अनुदान, जुनी पेन्शन, शिक्षक-प्राध्यापक भरती यासारख्या महत्वाच्या प्रश्नांसाठी बैठक घेतली. त्यामध्ये शाळा अनुदान व जुन्या पेन्शनचा प्रस्ताव सम्यक समितीच्या अहवालासह मंत्रीमंडळासमोर आणा, सरकार निर्णय घेईल असे निर्देश अजितदादा पवार यांनी दिले होते. परंतु काही दिवसांमध्ये आपणास अनपेक्षीत सत्ता बदलाला सामोरे जावे लागले.


आघाडी सरकार असताना शाळा, वर्गतुकड्या व कनिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द काढला, विनाअनुदान शाळांची संच मान्यता व वैयक्तिक मान्यता सुरू केली, मोफत पाठ्यपुस्तक व शालेय पोषण आहार योजना लागु करून घेतली, सहावा व सातवा वेतन आयोग लागु केला, विद्यार्थी पटसंख्या 20 व 25 वर केली, शिक्षण सेवकांचे नाव बदलुन सहाय्यक शिक्षक करून घेतले, वाढत्या महागाईमुळे त्यांचे मानधन दुप्पट करून घेतले, महिला शिक्षकांच्या प्रसुति रजेमध्ये वाढ करून घेतली, कनिष्ठ महाविद्यालयीन व एम.सी.व्ही.सी. शिक्षकांचा अनेक वर्षांपासूनचा जिव्हाळ्याचा पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडवून घेतला.

प्राध्यापक भरतीसाठी संवर्गनिहाय आरक्षण लागु करून घेतले, तासिक तत्वावरील प्राध्यापकांच्या माननधानामध्ये वाढ करून घेतली असे कितीतरी प्रश्न आ.विक‘म काळे व आम्ही शासनदरबारी पाठपूरावा करून सोडवून घेतले. केंद्रातील सरकार हे फक्त उद्योगपतींचे आहे. आज महागाई, बेरोजगारी त्याच बरोबर शेतकर्यांच्या मालाला भाव नसणे या सार‘या महत्वाच्या समस्यांपुढे सर्वसामान्य जनता, बळीराजा आज हवालदिल झाला आहे. मात्र सरकारला याचे काही देणे-घेणे नसल्याचे सांगत आघाडीचे सरकार असताना महागाईवर बोलणारे आता मुग गिळून गप्प असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.

शिक्षकांचे अनेक प्रश्न आज शासन दरबारी प्रलंबित आहेत. हे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आ.विक‘म काळे यांना प्रथम पसंतीचे मत देवून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन यावेळी आ.सतीश चव्हाण यांनी केले. यावेळी मराठवाडा शिक्षक संघटनेचे पदाधिकारी अनिल दस्तूरकर यांनी आ.सतीश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत आ.विक्रम काळे यांना जाहीर पाठींबा दिला.

याप्रसंगी मा.आ.नागेश पाटील आष्टीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्यामजी चव्हाण, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंदराव भंडारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव देशमुख, प्रा.डी.बी. जांभरूणकर, मु‘याध्यापक जी.एन.गोरे, संदीप भुरे, यशवंत कांबळे, व्हीए.एन.राणे, अभय शिंदे आदींची उपस्थिती होती. तर माहूर येथील स्व.ग्यानबाजी केशवे विद्यालयात आयोजित सभेप्रसंगी समाधान जाधव, जयकुमार खराटे, किसन राठोड, प्रा.निरंजन केशवे, प्रकाश गायकवाड, प्रा.भगवान जोगदंड, आनंद वानखेडे आदींची उपस्थिती होती.