
नांदेड| एमजीएम कॉलेज समोरील अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या संघर्ष कार्यालयात दि.१८ जानेवारी रोजी हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. नांदेड जिल्ह्यातील शोषित, पीडित महिलांना न्याय मिळावा म्हणून कार्य करणारी राष्ट्रीय महिला संघटना म्हणून सुपरिचित असलेल्या जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या जिल्ह्यात जोमाने कामाला लागल्या आहेत. रेशन आणि घरकुल तसेच इतर प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालया समोर अनेक यशस्वी आंदोलने केली आहेत.


महिलावरील अन्याय अत्याचाराचे अनेक प्रश्न उघडकीस आणून वाचा फोडून शासन दरबारी पाठपुरावा केला आणि करीत आहेत. जिल्हा निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड आणि तालुका अध्यक्ष कॉ.लता गायकवाड, नांदेड तालुका सचिव कॉ. मनीषा धोंगडे, अर्धापूर तालुका निमंत्रक कॉ.सुंदरबाई वाहूलकर ह्या महिला संघटनेच्या पुढारी नेटाने काम करीत आहेत. लवकरच जिल्हाभर महिला मेळावे घेऊन जिल्हा अधिवेशन घेण्याचा त्यांचा माणस आहे. महापुरुषांच्या जयंत्या व अनेक संस्कृतीक कार्यक्रम संघटनेच्या वतीने घेतले जात आहेत.


हळदी कुंकू कार्यक्रमाच्या अनुषंगाने माता सावित्री फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून जिल्हा कार्यालयात सरसगट महिलांना संक्रातीचे वाण देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला. अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा कॉ.लता गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात संगीता गायकवाड,स्नेहलता भिसे,सविता कोलते,छाया आंबटवार,सुनीता कोलते, शिल्पा साबळे,मीना गायकवाड,संजीवनी कुलकर्णी, प्रेमा वाघमारे,कल्पना पांचाळ, यशोदा एंकटवाड, ज्योती नीलकंठे,सपना सूर्यवंशी,सविता गायकवाड,पल्लवी शिंदे,मीना रणखांबे आदींनी सहभाग नोंदविला आहे.

