
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगांवचे भुमिपुत्र तथा दैनिक गाववालाचे तालुका प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार माधव पाटील चव्हाण यांना कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा महत्त्वाचा कै.दुर्गादास सराफ उत्कृष्ट जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून कंधार येथे या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.


कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा लाईव्ह च्या वतीने पत्रकारितेत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरव केला जातो याच निमित्ताने जेष्ठ पत्रकार माधव पाटील चव्हाण यांच्या कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठानचे सचिव मिर्झा जमीर बेग यांच्या अध्यक्षतेखाली चव्हाण यांना कै.दुर्गादास सराफ उत्कृष्ट जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


या निमित्त पुरस्कृत पत्रकार मित्र माधव पाटिल चव्हाण यांना मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन चौधरी.तालुका सहसचिव रामप्रसाद चन्नावार .तालुका कार्यकारिणी सदस्य साहेबराव धसाडे. उद्धव धसाडे.माधव पवार.परमेश्वर जाधव.बापुराव बडुरे सर .भगवान शेवाळे. इत्यादि शुभेच्छां देऊन सत्कार केले आहे.

