
नांदेड| सध्या वातावरणातील बदलामुळे सर्वसामान्य जनतेस विविध आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. यात एस. टी. महामंडळ कर्मचारी हि समाविष्ठ आहेत. रस्तेवाहतूक सुरक्षित प्रवास हा अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे प्रवांशांची सेवा करणारे महामंडळ आहे.


राज्य परिवहन बसेसचे अपघात टाळण्यासाठी महामंडळा कडून नियमितपणे अपघात उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने दरवर्षी जानेवारी महिन्यात राज्यभरात अपघात सुरक्षा अभियान राबविण्यात येते. यामध्ये वाहक, चालकांचे व यांत्रिक कर्मचारी यांचे प्रबोधन करण्यात येते. परिवहन विभाग, पोलीस विभाग व सामाजिक संस्था यांचे मार्फत अपघात टाळण्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शनहि करण्यात येते.


याच सातत्याने व या प्रघातास अनुसरून व राज्य शासनाच्या “अपघात व सुरक्षा मोहीम २०२३” चे औचित्य साधून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड व श्री गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने एस.टी महामंडळातील वाहक, चालक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि. २० जानेवारी २०२३ वेळ: सकाळी. १०.०० ते दु: २-०० पर्यंत एस.टी बस स्टॅड परिसर, नांदेड येथे करण्यात आले आहे.


या शिबिरात जनरल मेडीसीन, आर्थोपेडिक, डायबेटीज, सर्जन, डेंटल, फिजीओथेरपी ई. कन्सलटेशन (सल्ला व मार्गदर्शन) केले जाणार आहे. त्याच बरोबर दैनंदिन दिनचर्चेबाबत योग्य मार्गदर्शन, आजार व आहार संबंधित समुपदेशन संपूर्णतः मोफत असून यथोचित मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी एस.टी महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या “मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे संयुक्त आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड व श्री गुरुजी रुग्णालय नांदेडच्या व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे.
