
नांदेड| 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे / चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यावर प्रतिबंधित केले आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी शनिवार 4 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू राहील, असे आदेशात नमूद केले आहे.


औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक मतदान केंद्राची अंतिम यादी गुरुवारी होणार प्रसिद्ध
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुक 2023 साठी निश्चित करण्यात आलेली मतदान केंद्राची अंतिम यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर व संबंधित कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर गुरुवार 19 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध होणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

