Monday, February 6, 2023
Home नायगाव महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परीचालक कर्मचारी संघटनेच्या नांदेड जिल्हाअध्यक्ष पदी शेषेराव बेलकर -NNL

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परीचालक कर्मचारी संघटनेच्या नांदेड जिल्हाअध्यक्ष पदी शेषेराव बेलकर -NNL

तर नायगांव तालुकाध्यक्षपदी रामकृष्ण मोरे उपाध्यक्षपदी गजानन हेंडगे यांची निवड

by nandednewslive
0 comment

नायगांव, रामप्रसाद चन्नावार| ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असणारे संगणक परिचालक हे ग्रामपंचायतचा कणा आहेत.ग्रामपंचायत विभागाचे ऑनलाईन कार्य करणाऱ्या, ग्रामीण स्तरावर सेवा सुविधा देणाऱ्या ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेची बैठक 17 जानेवारी 2023 रोजी दुपारी बळवंतराव चव्हाण सभागृह पंचायत समिती नायगाव येथे पार पडली.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेषेराव बेलकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गर्जे, जिल्हा सचिव अंकुश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. महाराष्ट्रराज्य संगणक परिचालक संघटनेच्या नायगांव तालुका अध्यक्षपदी रामकृष्ण मोरे तर उपाध्यक्षपदी गजानन हेंडगे, सचिव पदी हणमंत कोकुर्ले, सहसचिव बापूराव शिंदे, कोषध्यक्ष साहेबराव ढगे, संपर्कप्रमुख किरण शिंदे, मालिकार्जून कुंभार, प्रसिद्धी प्रमुख मालू कांबळे, सर्कल प्रमुख नागेश जाधव, विश्वाबर शिंदे, संदीप गुंठे, मारोती कदम, सदस्यपदी प्रल्हाद आडकीने, सविता मोरे, संगीता रहाटे, गंगाराम पांचाळ, संभाजी उपासे यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष शेषेराव बेलकर यांनी सांगितले की संगणक परिचालकाच्या अडचणी सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रर्यन्त करणार आहे. संगणक परिचालकाला येणाऱ्या अडचणी, शासन स्तरावरील दबाव, तांत्रिक अडचणी सोडणव्यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यअध्यक्ष गुणवंत राठोड यांच्या नेत्रत्वाखाली संघटनेचा लढा सुरू असून आगामी काही दिवसात आपणास नक्कीच अच्छे दिन येतील असा विश्वास व्यक्त केला. व मुंबई मंत्रालय येथे झालेल्या संगणक परिचालक बांधवांना आकृती बंधात समाविष्ट करण्याच्या संदर्भात शासन स्तरावरील घडामोडींचे सविसर मार्गदर्शन केले व पुढील बैठकीमध्ये कार्यकारणीचा विस्तार होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शेषेराव बेलकर यांनी जाहीर केले आहे.

banner

बळवंतराव चव्हाण सभागृहात निवड जाहीर झाल्यानंतर ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टी. जी. पाटील रातोळीकर सचिव सूर्यकांत बोडले, तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामसेविका यांनी नवीन कार्यकारणीस शुभेच्छा देऊन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यापुढे ग्रामसेवक संघटना तुमच्या सोबत खंबीर पणे असल्याचे टी.जी.पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गजानन हेंडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण मोरे यांनी मांडले. कार्यक्रमाचे आभार मालू कांबळे यांनी मांडले. यावेळी तालुक्यातील संगणक परिचालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!