
नवीन नांदेड। स्वारातीम विघापिठाचे कुलगुरु डॉ.उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी सदस्य म्हणून शिवाजी चांदणे यांची विद्यापीठाच्या अभिसभेवर नामनिर्देशानाद्वारे नियुक्ती केली आहे.


महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा नुसार विद्यापीठ परिसरातील शिक्षकेत्तर कर्मचारी सदस्य म्हणून नियुक्त करण्याचे अधिकार कुलपती यांनी कुलगुरु यांच्याकडे दिली आहे.कुलगुरू यांच्या अधिकारात विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून एक प्रतिनिधी विद्यापीठाच्या अधिसभा या प्राधिकरणावर नियुक्त केला जातो.कुलगुरू यांनी शिवाजी चांदणे यांची निवड केली.


शिवाजी चांदणे हे विद्यापीठ जमीनग्रस्त पाल्यां पैकी एक असून सन 2004 मध्ये विद्यापीठात सेवेत रुजू झाले. आज रोजी ते वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत.2020 मध्ये विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या रोप्य महोत्सवी वर्ष आणि वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट कर्मचारी म्हणुन सन्मानित केले आहे.


विद्यापीठ जमीनग्रस्त पाल्यांना सेवेत सामावून घेऊन कायम करण्यासाठी सदैव संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या अडचणी, मागण्या सोडवण्यासाठी एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये त्यांची ओळख आहे.चांदणे यांची निवड झाल्याबद्दल सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
