
नांदेड| दिनांक 18/1/2023 रोजी ऑर्गनायझेशन ऑफ राइट्स ऑफ ट्रायबल संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदनात म्हटले आहे की, संचालक आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टीआरटीआय महाराष्ट्र पुणे यांनी दिनांक 22/12/1994 च्या आदेशानुसार भारतीय घटना अनुसूचित जमाती दुरुस्ती आदेश क्रमांक 1956 सुधारणा आदेश 1960 अन्वये नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात महादेव कोळी, मनेरवारलू गॉड गवारी या जमाती अधिसूचित केलेल्या नाहीत.


त्यामुळे या जिल्हयात कोळी जातीचे लोक महादेव कोळी, मनेरवार जातीचे मनेरवारलु ठाकुर जातीचे ठाकर गौड जातीचे लोक राजगोंड असे वेगवेगळ्या गैर आदिवासी जाती आदिवासीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी शासनाची दिशाभूल करून तसेच शालेय दस्तावेजात खाडकोड करून खोटे प्रमाणपत्र तयार करून अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र काढून आदिवासी च्या सोयी सवलती तसेच नोकऱ्या त्याचबरोबर राजकीय आरक्षण सुद्धा लाटतात.


जात पडताळणी समिती पडताळणी करण्यासाठी जेव्हा शाळेवर दस्तावेज तपासण्यासाठी जातात त्यावेळेस शाळेवरचे दस्तावेज जाळल्याच्या कितेक घटना नांदेड जिल्ह्यात व मराठवाड्यात घडल्या आहेत. त्याचबरोबर किनवट येथे 2016 ते 17 च्या दरम्यान बनावट दस्तऐवज तयार करण्यात टोळीचा पडदाफास झाला असून प्रशासनाकडे त्या टोळीचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहे. असे असतानाही नामसदरशे गैर आदिवासी वारंवार प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर करून प्रमाणपत्र देण्यास भाग पाडतात ही खेदाची बाब आहे.


हि बोगसगिरी थांबवण्यासाठी आदिवासी समाजाने वारंवार निवेदन मोर्चे काढून शासनाच्या निर्देशनास आणून दिलेली आहे. परंतु आजून आदिवासीतील घूसखोरी थांबली नाही. परिणामी बोगस प्रमाणपत्र आधारे आदिवासींच्या वाट्याच्या लाखो नोकऱ्या गैर आदिवासींनी लाटल्या. त्यामुळे खरा आदिवासी त्याच्या संविधानिक हक्कापासून वंचित राहिल्यामुळे देशोधडीला लागला आहे. आता आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढल्यामुळे नवीन युवकांच्या नोकऱ्या गैर आदिवासींनी बळकावल्यामुळे तरुण पिढीवर रोज मंजुरी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आदिवासी तरुणांमध्ये प्रशासनाबद्दल व शासनाविरुद्ध प्रचंड रोस पसरला असून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार आदिवासी समाजाने केला आहे.

निवेदन देण्यासाठी उपस्तीत डॉ. हनुमंत रिठे आफोट अध्यक्ष, संजय माजळकर जिल्हा कार्याध्यक्ष, संतोष तायवाड प्रवक्ता, लक्ष्मण यळने नांदेड तालुका आफोट अध्यक्ष गजानन धुमाळे, पांडुरंग मेंडके, आड. गणेश तोडकर, आफोट सचिव रामभाऊ खरोडे, रामकिशन देशमुख, सारंग भुरके पांडुरंग खरोडे, विजय चौरे आदींची उपस्थिती होती.
