
हदगाव। दिनांक १७/०१/२०२३ रोजी हदगाव हिमायतनगर येथील सर्व मंडळ अधिकारी तलाठी यांची अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी नांदेड व बोरगावकर अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांनी सज्जनिहाय वसुलीचा आढावा घेतला.

सदर बैठकीमध्ये मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी सर्व तलाठी व यांना वर्ग दोन चे वर्ग एक प्रकरणे शोधणे म.ज.म.अ. कलम 42 अ. ब.क.ड. ची प्रकरणी शोधणे, अनाधिकृत अकृर्षिक प्रकरणे शोधणे ,तुकडे बंदीची प्रकरणे शोधणे ,शर्तभंग प्रकरण नेमून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या आहेत तसेच नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचा सर्वे करून विहित नमुन्यात अहवाल सादर करावा व शंभर टक्के इ-पीक पाहणी करून अहवाल सादर करण्याबाबत आदेशित केले आहे.

सदर या बैठकीस मा. श्री अभिजीत राऊत ,जिल्हाधिकारी नांदेड व मा. श्री बोरगावकर अपर जिल्हाधिकारी नांदेड, मा. श्री ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी हदगाव ,श्री जीवराज डापकर तहसीलदार हदगाव, श्री. डी.एम. गायकवाड तहसीलदार हिमायतनगर, सर्व नायब तहसीलदार सर्व अवल कारकून सर्व मंडळ अधिकारी सर्व महसूल सहाय्यक सर्व तलाठी उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी साहेब यांच्या कडे तालुक्यातील नागरिकांनी तक्रारीचे निवेदन देण्यासाठी रांगा लागल्या होत्या. त्या सर्व तक्रारीचे अर्ज निवेदन जिल्हाधिकारी साहेबांनी घेऊन त्यांच्यावर लगेच कारवाई करण्यात येईल असेही निवेदन करताना सांगण्यात आले आहे.

