
नायगांव, रामप्रसाद चन्नावार| दर्शन वार्षिक संजीवनी समाधीकाल महोत्सव सोहळ्या निमित्ताने येवतीच्या यात्रेत हजारो भाविक भक्तांनी नराश्याम महाराज संजीवनी समाधीचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती.


दक्षिण भारतातील माळेगाव खंडोबा यात्रा संपल्यानंतर येवती येथे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक समजले जाणाऱ्या अठरापगड जातीचे महाराष्ट्र आंध्रा कर्नाटक राज्यातील भाविकांच्ये श्रद्धास्थान असलेल्या नवसाला पावणाऱ्या पुरातन कालीन लघु आळंदी संजीवनी समाधी श्री सद्गुरु नराश्याम महाराज यांच्या यात्रेनिमित्ताने मोठ्या प्रमाणात यात्रा भरली जाते.


यामध्ये संस्थान समितीच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण ,गाथा भजन ,कीर्तन , वेद पंडित ब्राह्मण यांच्या मंत्रचाराद्वारे महाअभिषेक पूजा महाआरती, महाप्रसाद ,कुस्ती, आदी विविध कार्यक्रमाचे करण्यात आले होती दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली यात्रेनिमित्ताने महाप्रसाद आमदार राजेश पवार सौ पूनमताई पवार यांच्या वतीने करण्यात आला यावेळी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर मुखेडचे आमदार तुषार राठोड यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती महाआरतीनंतर श्री सद्गुरु नराशाम महाराज यांनी उपदेशपर भाविकांना प्रवचन दिले

