Saturday, January 28, 2023
Home नांदेड भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूकीबाबत दुसरे प्रशिक्षण संपन्न

by nandednewslive
0 comment

नांदेड| 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रीयेत केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार दक्षता घेवून जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

05-औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदान प्रक्रीयेत केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी करावयाच्या प्रक्रियेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे दुसरे प्रशिक्षण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उप जिल्हाधिकारी (निवडणूक) संतोषी देवकुळे, तहसिलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसिलदार राम बोरगावकर व निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व तालुक्याचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

ही निवडणूक जिल्ह्यातील 30 मतदान केंद्रावर होत असून यासाठी प्रत्येक केंद्रावर 4 याप्रमाणे अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. ही निवडणूक प्रक्रीया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशिवाय होत आहे. मतपत्रिका व बॅलेट नुसार ही निवडणूक प्रक्रीया होत असल्याने निवडणूक कामात नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी काळजीपुर्वक कामकाज करावे असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. तसेच निवडणूकीत मतदारांना ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणाऱ्या ओळखपत्राबाबत यावेळी माहिती दिली.

या निवडणूक प्रक्रीयेत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी निवडणूकीच्या एक दिवस अगोदरपासून ते मतदान प्रक्रिया संपूर्ण होईपर्यत करावयाच्या कर्तव्याबाबत तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी मतदानाची पध्दत, मतदान पध्दतीबाबत मार्गदर्शक सूचना, कर्तव्ये व जबाबदाऱ्या यासह मतपेट्या उघडणे, बंद करणे, सीलबंद करणे, कागदी सील, मतपत्रिका व मतदान याद्या तपासणी, मतदानाच्या दिवशी अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूक साहित्य ताब्यात घेताना घावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.

banner

तसेच मतदान अधिकाऱ्यांनी मतदानाची आकडेवारी दर दोन तासांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना सादर करणे आवश्यक राहील. मतदान सुरु होण्यापूर्वी तसेच मतदान संपल्यानंतर मतपेटी व इतर मतदानाचे साहित्य हाताळण्याबाबत चे प्रात्यक्षिक यावेळी करुन दाखविले. या प्रशिक्षणास अधिकारी- कर्मचाऱ्यांना मतपेटी हाताळणी बाबतचे प्रमाणपत्र वितरीत केले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!