
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालुका हा आदिवासी व डोगराळ भाग आहे, शेती व मजूरी करण्या शिवाय येथे उद्योग नाही सिचंनाची व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमानात कोरडवाहू शेतीवरच अवलबून राहावे लागते , खरीप हंगाम सपंत आला मजूरांच्या हाताला काम नसल्याने गाव खेड्यातील मजूर वर्ग आपल्या परीवारासह उसतोड,विटभट्या,व मिळेल त्या कामासाठी शहराकडे धाव घेत आहे.


शाशनाने रोजगार हमी योजना सूरु केली पण ‘रोजगार हमी, कामकमी, अर्ध्यात तुम्ही अन् अर्ध्यात आम्ही’, अशी गत या योजनेची झाली आहे. ही योजना मजुरांना काम देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आली. मात्र कालांतराने या योजनेतील बहुतांश कामे यंत्राद्वारे केली जात असल्याने मजुरांवर रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. रोजगार मिळत नसल्याने मजूर स्वतःचे व कुटुंबाचे पोट भरण्यासाठी गाव सोडून शहरी भागात स्थलांतरित होत आहेत.


माहूर तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सध्या बंद असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी जेसीबी मशीन व यंत्राच्या सहाय्याने कामे करून घेतली जात आहेत. ज्या मजुरांचे नाव मस्टरवर असते प्रत्यक्षात त्या मजुरांचा कामावर थांगपत्ताही नसतो याबाबत अनेक तक्रारी करूनदेखील कोणतेच काम गरजू मजुरांकडून केले जात नसल्याने मजुराचे स्थलांतर होत आहे. दोन वर्षात मनरेगा अंतर्गत तालुक्यात वयक्तिक लाभाचे व सार्वजनिक हिताच्या कामात प्रचंड प्रमाणात अनियमितता करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या डझनावरी तक्रारी झाल्या.गोकुळ गोंडेगाव येथे जिल्हास्तरीय समितीने भेट देऊन मनरेगा कामाची चौकशी केल्याचा देखावा उभा केला.


परंतु आज पावेतो कुणावरही कारवाई केली नाही, हे विशेष. वझरा (शे. फ.)-अजनी गट ग्रामपंचायतने चालू आर्थिक वर्षात काही शेतकऱ्यांनी शेततळ्याचे अत्यल्प काम करून मजुरांचे नावे मोठ्या प्रमाणात देयके उचलले अशी तक्रार माजी सरपंच हनुमंत मुंडे व भाजप उपाध्यक्ष हरीश मुंडे यांनी दि.२७ व २८ डिसें. रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांचेसह सर्व संबंधितांकडे केली होती..त्यानंतर उर्वरित कामे आटोपती घेण्यासाठी जेसीबी मशीनची सहाय्यता घेऊन शेततळ्याचे काम सुरू केले, असता दोन्ही तक्रारकर्ते व गंगाराम नागरगोजे, रानबा मुंडे, वाघंबर मुंडे, विठ्ठल केंद्रे यांनी सदरचे काम थांबवून जेसीबी मशीन चालकास हुसकावून लावले.तालुक्यात मनरेगाची अधिकांश कामे जेसीबी मशीनने केली असल्याच्या अनेक तक्रारी झाल्यात.या घटनेने त्यावर शिक्कमोर्तब झाले मात्र त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही, काम झाल्यावर संबंधित विभाग आणी ठेकेदार यांनी रोजगार हमी या योजनेच्या नावावर चांगलेच चांगभले केल्याचे दिसते. शहरावरील रोजगाराचा भार कमी व्हावा, गावात मजुरांना रोजगार मिळावा या हेतूने ही योजना अंमलात आणली. मात्र ग्रामपंचायती पासून ते प्रशासकीय यंत्रणेपर्यंत एकच साखळीअसल्याने कोणतीच दखल घेतली जात नाही.

“योजनेचे उद्दिष्ट हरवले”
ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे व कामासाठी मजुरांना गाव सोडण्याची वेळ येऊ नये तसेच कामाच्या शोधात गेलेल्या मजुरांच्या मुलाबाळांची हेळसांड होऊ नये म्हणून महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंमलात आणण्यात आली. मात्र, या योजनेतील कामे आता सर्रास यंत्राद्वारे केली जात असल्याने या योजनेचे उद्दिष्ट हरवल्याचे जाणवते.
“कामावरील खरा मजूर बाजूला सारला”
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली तेव्हा मजूर प्रत्यक्ष कामावर जाऊन अंग मेहनत घेत असत. त्यांचे मस्टरदेखील भरले जाई. मात्र, कालांतराने बदल होऊन शेततळे, तळे, पांदण रस्ते,रस्ते, विहिरी आदी कामे यंत्राद्वारे तडकाफडकी होऊ लागलीमा आहेत. त्यामुळे रोहयो योजनेतील खरा मजूर बाजूला सारला गेला आहे.

‘मर्जीतील मजूर” !
रोहयो योजनेंतर्गत येणारी सर्व कामे सध्या जेसीबी मशीन व तत्सम यंत्राद्वारे केली जातआहेत. यंत्राच्या सहाय्याने रोजगार हमीची कामे होऊ लागल्याने यासाठी मजूरदेखील मर्जीतील दाखविले जात आहेत. मस्टर तयार केले जाते व नंतरत्याच्या खात्यावर खर्च झालेली रक्कम त्याच्या स्वाक्षरीने उचलल्या जात आहे.