
लोहा| लोहा नगर पालिकेची निवडणुक दहा महिन्यावर येऊन ठेपली आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी ज्यांना निवडून दिले त्यानी काँग्रेस नेत्यांचे फोटो लावून वाढदिवस सुरू केले. शिवाय शहरात स्वच्छता टेंडरवर दरमहा अठरा लक्ष रुपये खर्च होऊनही शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे आहेत. असा व्यवस्थे विरुद्ध जनमानसांत तीव्र नाराजी आहे. त्यावर पर्याय शोधत भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाटील पवार यांनी जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रवीण पाटील यांचे नेतृत्वाखाली वार्ड निहाय भजपायुमोच्या शाखा काढण्याचे जाहीर केले आहे.


लोहा शहरात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रत्येक वार्डात शाखा स्थापन करणार अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे नवनियुक्त शहराध्यक्ष अविनाश पाटील पवार यांनी दिली. भाजपा युवा मोर्चाच्या लोहा शहराध्यक्षपदी लोहा येथील भाजपचे तरूण तडफदार एकनिष्ठ कार्यकर्ते तथा जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे लोह्यावर व लोहा वासीयांचे त्यांच्यावर प्रेम आहे.


शहर व तालुक्याच्या राजकारणा तील मोठे प्रस्थ पवार परिवार होय त्याच कुटुंबातील अविनाश पाटील पवार यांची नुकतीच भाजपा युवा मोर्चाच्या लोहा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते त्यांनी पक्षाचे काम जोमात सुरू केले असून, पक्षाच्या प्रत्येक बैठकीला, कार्यक्रमाला ते आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उपस्थित राहतात.


आता त्यांनी लोहा शहरात युवकांची मोठी फळी तयार केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, व केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना लोकांच्या पर्यंत पोहचवीत आहेत. नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर व भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या उपस्थितीत प्रत्येक वार्डात शाखा स्थापन करून घर तेथे कार्यकर्ता मोहीम राबविणार अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे लोहा शहराध्यक्ष अविनाश पाटील पवार यांनी दिली.
