
नविन नांदेड। सिडको येथील वृत्तपत्र विक्रेता टिन शेडचा प्रथम वर्धापनदिन निमित्ताने सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेते पाल्यांना परिक्षा प्याड पेन, मिठाई वाटप करून, जेष्ठ विक्रेते व नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व मान्यवरांच्या सन्मान,सत्कार सोहळा १९ जानेवारी रोजी नावामनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे व लोकमत चे व्यवस्थापक संचालक विजय पोवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.


नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचा वतीने सिडको येथील वृत्तपत्र विक्रेता यांच्या साठी गत वर्षी मनपा निधी अंतर्गत माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या व सिडको लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकाराने सुमारे ११ लाख ५० हजार रुपयांच्ये टिनशेड बांधुन देण्यात आले होते, या शेडला १९ जानेवारी २३ रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या वतीने संघटनेच्या सिडको येथील टिनशेड रंगरंगोटी व विद्युत रोषणाई व आकर्षक रांगोळी काढून फुलांचा पुष्प वृष्टीने मान्यवरांच्ये स्वागत करण्यात आले.


यावेळी नावामनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, दैनिक लोकमत नांदेडचे व्यवस्थापक संचालक विजय पोवार, नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष किरण देशमुख, उपाध्यक्ष शाम जाधव, सचिव रमेश ठाकूर, कार्याध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे, लोकमत वितरण व्यवस्थापक गोविंद कंधारे, अमरजित वरळे, संजीव कुमार गायकवाड,संदीप गोरटींवार, पत्रकार डि.गा.पाटील, छायाचित्रकार सांरग नेरलकर, यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत होती.प्रांरभी जेष्ठ विक्रेते व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व विधीवत पूजा करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


जेष्ठ विक्रेते दौलतराव कदम, शेख सयोधदीन, मदन सिंह चौहान, महिला वितरक वंदना लोणे, एकनाथ श्रंगारे, साहेबराव, यांच्या व नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष सतीश कदम यांनी केले तर ऊपसिथीत मान्यवरांच्ये स्वागत बालाजी सुताडे,साई गोटमवाड, गणेश कांबळे, गणेश ठाकूर,राम धांवडे,शुभम कुंभार, गजानन धांवडे,तातेराव वाघमारे, अनिल धांवडे,अमोल नांदेडकर, आर्या लोणे, महेश सुताडे, व वृत्तपत्र विक्रेते यांनी परिश्रम घेतले. अल्प कालावधीत सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेने विविध ऊपकम राबवुन नावलौकिक केले असून वर्धापनदिन निमित्ताने ऊपसिथीत मान्यवरांनी पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेत्यांना शुभेच्छा दिल्या.
