Thursday, February 2, 2023
Home नांदेड रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड मा मा येवले यांचा 84 वा अभिष्टचिंतन सोहळा -NNL

रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड मा मा येवले यांचा 84 वा अभिष्टचिंतन सोहळा -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| ज्ञानाचे प्रतीक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील अध्वर्यू नेते रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाद्वारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक समाज भूषण पुरस्काराने सन्मानित नेते ॲड मा मा येवले यांच्या 84 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 6.00 वाजता प्रज्ञा करुणा विहार देगांवचाळ नांदेड येथे केले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, प.पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे विश्वस्त ॲड मा मा येवले यांच्या 84 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि व्याख्यानाचे आयोजन कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आयु. प्रफुल्ल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली केले असून यावेळी प्रमुख व्याख्याता म्हणून नांदेड येथील सुप्रसिध्द विचारवंत डॉ राजेंद्र गोणारकर हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण चळवळीशी ध्येयाने एकनिष्ठता कशी जोपासावी.

या विषयावर आंबेडकरी युवक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री मा. डीपी सावंत, आंबेडकरी नेते मा. सुरेशदादा गायकवाड, आमदार श्री मोहनअण्णा हंबर्डे पाटील, माजी उपमहापौर स. सरजीतसिंघ गील, प्रा. कवी रविचन्द्र हाडसनकर, मा. दिगांबर मोरे, मा. रमेश सोनाळे, मा. सुखदेव चिखलीकर, मा. सुरेश हाटकर, मा. रमेश गोडबोले, मा. राजू एंगडे हिंगोली, मा. मंगेश कदम, मा. विकास कदम, मा. संजय कौठेकर, मा. सुभाष काटकांबळे, मा. साहेबराव पुंडगे, मा. ॲड विष्णू गोडबोले, मा. चंद्रकांत भोकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. म्हणून ॲड मा मा येवले यांचे हितचिंतक, रिपब्लिकन अनुयायी, मित्र मंडळी आणि युवक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ॲड मा मा येवले यांचे अभिष्टचिंतन करावे अशी विनंती प्रकाश येवले, सुभाष लोखंडे, संतोष नरवाडे, अशोक भोरगे, साहेबराव गायकवाड, गौतम येवले, माधव गायकवाड, तथागत ढेपे, राजू गच्चे आदींनी केली आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!