
हिमायतनगर| येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आयोजित “आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आजादी की मशाल यात्रा” दिनांक 20 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत केली आहे. विद्यापीठाच्या या मशाल यात्रेचे आगमन दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयांमध्ये होणार आहे. संबंधित मशाल यात्रेचे स्वागत दिनांक 21 जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या वतीने करावयाचे आहे.


त्या अनुषंगाने दिनांक 20 जानेवारी रोजी महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच नगरपरिषदेच्या महिला कर्मचारी यांच्या सहकार्याने परिसर स्वच्छता करण्यात आली.


या स्वच्छता अभियानासाठी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. कदम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे, सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे, क्रीडा संचालक डॉ. दिलीप माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सविता बोंढारे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थीनी आदींनी परिश्रम घेतले.
