
नविन नांदेड| प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजक संजय पाटील घोगरे, भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचे उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २६ जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील सर्वात मोठ्या असलेल्या या रक्तदान शिबीरात जमा झालेल्या रक्ता मधुन अनेक रूग्नांचे प्राण वाचले असुन अनेकांना मदत झाली आहे, या रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या रक्तपेढी यांनी तात्काळ अनेक रूग्नांना मदत केली आहे. कोरोना काळात या शिबिरामुळे मोठ्या प्रमाणात रक्तदान साठा उपलब्ध झाला होता, म्हणून या वर्षी ही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.


ऊधदाघाटक म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, तर अध्यक्षस्थानी संजय भाऊ कौडगे, तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड भाजपा जिल्हाअध्यक्ष प्रविण साले, भाजपा प्रदेश सदस्य संतुकराव हंबर्डे,चैतन्य बापू देशमुख,दिलीप कंदकुर्ते, माजी मनपा विरोधी पक्षनेते दिपक सिंग रावत डॉ.सचिन पाटील ऊमरेकर, मिलिंद देशमुख,यांच्या सह जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई पाटील देवरे,भाजपा नगरसेविका सौ.इंदुबाई घोगरे, सौ. बेबीताई गुपीले, पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, बालाजी पाटील पुणेगांवकर,माजी नगरसेवक राजू गोरे, सिडको मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख, संतोष वर्मा,जनार्दन ठाकूर, गजानन कते,यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती राहणार आहे,या रक्तदान शिबीर मध्ये जास्ती जास्त रक्तदान करून शिबीर यशस्वी करण्याचे आवाहन आयोजक संजय पाटील घोगरे ,अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष तथा संस्थापक युवा शक्ती मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

