
नांदेड| दिलीप ठाकूर यांच्यासारखे देवतुल्य कार्य इतर जिल्ह्यातील लायन्स पदाधिकाऱ्यांनी करून जनतेचा दुवा मिळवावा असे प्रतिपादन लायन्स प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया यांनी लायन्सच्या डब्याच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त केले.यावेळी २०२३ वर्ष्यातील एका दिवसासाठी रुग्णाच्या अन्नदानासाठी रुपये पंधराशे देणगी घेवून नोंदणी सुरु करण्यात आली.


लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा यांच्या वतीने रयत रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमात धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांना लायन्स सेवापदक देऊन गौरव करण्यात आला. वेगवेगळ्या उपक्रमात आर्थिक योगदान देण्याऱ्या नागरिकांचा व माध्यम प्रतिनिधीचा सिरोंपाव व मोत्याची माळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.


पुरुषोत्तम जयपुरिया,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले,लायन्स प्रदेश अध्यक्ष योगेश जायस्वाल,प्रांत सचिव अरुण मित्तल,विभाग अध्यक्ष संजय अग्रवाल व रयत रुग्णालयाचे सचिव डॉ. अर्जुन मापरे यांच्या हस्ते मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना व रयत रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना जयपुरिया पुढे म्हणाले की, दिलीप ठाकूर यांच्या संकल्पनेतून नांदेड येथे सुरु झालेल्या लायन्सच्या डब्याची पुनुरावर्ती अनेक ठिकाणी होत आहे.


त्यांचे कायापालट आणि मायेची उब सारखे आगळे वेगळे उपक्रम इतर ठिकाणी सुद्धा व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण साले यांनी मार्गदर्शन करतांना दिलीप ठाकूर यांचे कार्य संतासारखे असून त्यांच्या सेवेला तोड नसल्याचे सांगितले. योगेश जायस्वाल व डॉ. मापारे यांनी देखील दिलीप ठाकूर यांच्या विविध उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. संयोजक दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविक करतांना आगामी काळात स्वर्गरथ सुरु करून शंभर रुपये नाममात्र दरात अंत्ययात्रा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मनोदय व्यक्त केला.

जेष्ठ पत्रकार सुधीर प्रधान,धनराज भारती, दिगा पाटील,शेख शफी,संजय सूर्यवंशी यांच्यासह अनेक माध्यम प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.वसंत अहिरे,रमाकांत भंडारे, धोंडोपंत पोपशेटवार, सुभाष देवकते, अनिल चिद्रावार,पद्माकर कोडगिरे यांनी लायन्सच्या डब्यासाठी योगदान दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. भाऊचा माणुसकीच्या फ्रिजसाठी मदत करणारे रमेश कांबळे,अविनाश जोशी, अशोक माडेकर, नमिता पुरनाळे, डॉ. अभिलाषा राजभोज यांचे ऋण व्यक्त करण्यात आले. मायेची उबसाठी सहाय्य करणारे सुनंदा पांढरे,कामाजी सरोदे, सविता काबरा, प्रशांत पळसकर, सुरेश शर्मा यांचा सन्मान करण्यात आला.वाढदिवस अथवा स्मृतिदिनाचे औचित्य साधून एका दिवसासाठी तीस डबे पंधराशे रुपयात देण्यासाठी अनेकांनी नोंदणी केली.अतिशय सुटसुटीत झालेल्या कार्यक्रमाला अशोक धनेगावकर, राज यादव,सुनील साबू,सदाशिव महाजन, प्रवीण जोशी, शिवाजी पाटील, बिरबल यादव, जयश्री ठाकूर,बाबुराव पटवारी, संध्या पोपशेटवार, मेघा कोळेकर, सुनीता ठाकूर यांच्यासह अनेक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

लायन्स सेंट्रल अध्यक्ष शिवा शिंदे यांनी सुत्रसंचलन तर लायन्स अन्नपूर्णा अध्यक्ष अरुणकुमार काबरा यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, विलास वाडेकर, महेंद्र शिंदे, प्रभुदास वाडेकर, संतोष भारती यांनी परिश्रम घेतले. जयपुरिया यांच्या हस्ते नामफालकाचे अनावरण झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना लायन्सच्या डब्याचे वितरण करण्यात आले.भाऊच्या डब्याच्या सात वर्ष्यात आणि लायन्सच्या डब्याच्या चार वर्ष्यात सहा लाखापेक्षा जास्त गरजूना जेवणाचे डबे वितरित करण्यात आल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
