नविन नांदेड| बाभुळगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा पदाधिकारी यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार संरपच पुंडलिक मस्के यांनी केला.
नविन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी किरण देशमुख अध्यक्ष, उपाध्यक्ष शाम जाधव,सचिव रमेश ठाकूर, कार्याध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे, यांच्या सत्कार संभारभ दि.२० जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आला, यावेळी संरपच पुंडलिक मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका कार्यक्रमात हा सोहळा संपन्न झाला.
माजी चेअरमन प्रभाकरराव मोरे, ग्रामपंचायत सदस्य काळेश्वर मस्के, संजय लांडगे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी माधव बोडके, राजु मस्के,माजी सरपंच आंनदा गिरी,काळबा पाटील मस्के,मधुकर पाटील मस्के, बालाजी पाटील मस्के,दिपक पाटील मस्के, नागोराव पाटील मोरे यांच्या सह ग्रामस्थ यांच्यी उपस्थिती होती.