
नविन नांदेड| गौतमेश्वर संत संगम आळणी बुवा मठ धनेगाव येथे २२ जानेवारी रोजी यात्रा महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


गौतमेश्वर यात्रे निमित्ताने दि.२२ जानेवारी २०२३ रोज रविवार माघ शु. १ शके १९४४ सकाळी ५ ते ८ रूद्र अभिषेक शुभहस्ते १००८ श्री युदबन गंबीर बन महाराज कोलंबी व सकाळी १० ते ०४ महाप्रसाद दुपारी १२ ते ३ किर्तन तरातिर्थ माहात्म ह.भ.प.सखाराम महाराज सुकळीकर ह.भ.प.हरी महाराज येळेगावंकर यांच्ये होणार आहे.


संत संगम यात्रेत भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे श्री संत चरणरज दास श्री बाळगीरीजी पंचमगीरी (गौतमाश्रमी) रावसाहेब महाराज अळनीबुवा मठ धनेगांव, ता. जि.नांदेड यांनी केले

