
नांदेड| औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक-2023 च्या मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी तसेच या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी नांदेड जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेश लागू केले आहेत.


या मतदान केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकाराचे मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतीरीक्त व्यक्तीस प्रवेश करण्याकरीता प्रतिबंधीत करण्यात आले आहे. हा आदेश सकाळी मतदान सुरु झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

