
नांदेड। शहरातील बऱ्यामसिंगनगर, मैत्री चौक भागात असलेल्या जागृत देवस्थान श्री.संत सच्चीतानंद नंदी महाराज मंदिर येथे आज पालखी पुजन करून तब्बल एक लक्ष दिप प्रज्वलनाने हा परिसर प्रकाशमय बनला आहे.यात्रेनिमित्ताने दर्शनासह विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविक भक्तांची मांदियाळी वाढली आहे.


सविस्तर वृत्त असे की,नांदेड शहरात बर्यामसिंगनगर मैत्री चौक परिसरात श्री.संत सच्चितानंद नंदी महाराज यात्रेनिमित्त दर वर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या भक्तीभावाने सात दिवस शिवलीलामृत ग्रंथ पारायण व भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी या भागात लक्ष दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होत असतो.हदगांव तालुक्यातील कवाना येथून पालखी दिंडी पायी मार्गक्रमन करीत नांदेड येथे आज सायंकाळी ६ वाजता आगमन झाल्यानंतर पालखी पूजन व लक्ष दीप प्रज्वलनाचे उदघाटन श्रीयुत मुखेडकर यांच्या घराजवळील नंदी महाराज कमानी समोर नांदेडच्या माजी महापौर *शैलजा किशोर स्वामी* यांच्या शुभहस्ते व मंदिराचे पुजारी प्रभाकर महाराज बोंबले,ट्रस्टचे अध्यक्ष आर.टी.कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


याप्रसंगी देलमडे,अरुण महाराज गोदरे,निरंजन वजिराबादकर,गुंजकार, बालप्रसाद काबरा,बालाजी श्रीराने तसेच,या भागातील सामाजिक कार्यकर्ते नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष व नागापूरकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तथा मैत्री चौक ग्रुपचे अध्यक्ष *श्रीधरराव केशवराव नागापूरकर*,सतीश बोंबले,शिवा महाराज बोंबले, मोकटे, माधव गुट्टे,हुरने, चाफळकर,दत्तात्रय घोलप, विशाल हेरे यांच्यासह या भागातील हजारो नागरिक व भाविक भक्तांची उपस्थिती होती. दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले असून या भागातील हजारो भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत या भक्तिमय सोहळ्याचा आनंद घेतला व भक्ती भावाने सात दिवस नित्य नियमाने श्रद्धेने पूजन करत हा सोहळा पार पडला.

