नांदेड। जिल्हापरिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला दलालांचा सुळसुळाट थांबविण्याची आग्रही मागणी संबधित दोन्ही शिक्षणाधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मकसूद पटेल लोहगांवकर यांनी आज निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग,वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक/माध्यमिक,लेखाधिकारी (शिक्षण) या कार्यालयात अधिनस्त कोणत्याही शाळेच्या कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कामे करून घेण्यासाठी त्या शाळेतील मुख्याध्यापक,लिपिक यांनी शाळेचे नियोजित कामे शासकीय कार्यालयास पाठपुरावा करून कामे करून घेणे न्यायसंगत असतांना काही कर्मचारी संघटनेचे चमकोगिरी करणारे नेते कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा दलाली करणे, कार्यालयात बसून अधिकारी यांच्या सोबत जवळीक दाखवून लोकांची दिशाभूल करून कामे घेऊन करून देणे अश्या कामातून हजारो रुपये वसूल करणे तसेच,काही खाजगी उर्दू शाळेचे सेवानिवृत कर्मचारी यांनी जिल्हयातील उर्दू शाळेचे टेंडर घेऊन काम करून देत आहेत.
असे वेगवेगळे कामे करणारे दलाल व काही कर्मचारी अध्यापनाचे कामे सोडून वरील सर्व कार्यालयात उच्छाद मांडून ठेवला असल्याचे लोहगांवकर यांनी निवेदनात नमूद करून या प्रकरणाची गांभीर्य पूर्वक नोंद घेऊन तात्काळ अश्या लोकांवर पायबंद घालावे अशी मागणी मकसूद पटेल लोहेगावकर यांनी केली असून या निवेदनाच्या प्रति,प्रतिलिपी माहितीस्तव व योग्य त्या कार्यावाहीस्तव वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक/माध्यमिक,नांदेडचे अधिक्षक,लेखाधिकारी आदींना पाठविल्या आहेत.