
पुसद| यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे शनिवार दि. २१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता चर्मकार समाजाचा राज्यस्तरीय वधू – वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे, यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


शिव कमल मंगल कार्यालय (लॉन्स), काकडदाती, सांडवा मांडवा रोड, पुसद येथे २१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठिक ११ वाजता या परिचय मेळाव्याचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होणार आहे. या मेळाव्याला शुभेच्छा देण्यासाठी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.


प्रा. शिवाजी बळीराम राठोड (पुसद), श्याम इंगळे (वाशिम), संजय तरवरे (यवतमाळ), मीनाक्षी सावळकर (यवतमाळ), भगवान गायकवाड (उमरखेड), वसंतराव धाडवे (वाशिम), गजानन गोडवे (सामाजिक कार्यकर्ते, आर्णी), रघुनाथ इटकरे (सामाजिक कार्यकर्ते, आदिलाबाद), एड. कैलाश वानखेडे (मुडाणा), गजानन वानखेडे (पत्रकार, उमरखेड), दत्ता गंगासागर (सामाजिक कार्यकर्ते, उमरखेड), विश्वनाथ विणकरे (सामाजिक कार्यकर्ते, ब्राह्मनगाव), उत्तम सोनटक्के (सामाजिक कार्यकर्ते, दिग्रस), प्रभाकर येलतवार (सामाजिक कार्यकर्ते, शेंबाळ पिंप्री), दिनेश पाचखंडे (सामाजिक कार्यकर्ते, फुलसावंगी), अनिल नगरधने (सामाजिक कार्यकर्ते, पुसद), गजानन पाटील (सामाजिक कार्यकर्ते, महागाव) आणि समता परिषदेचे पुणे जिल्हा प्रमुख हरिभाऊ खंदारे व समाजातील मान्यवर मंडळीची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


हा वधू वर परिचय मेळावा पूर्णतः निःशुल्क असून हरिभाऊ रा. खंदारे, सुभाष विणकरे, विठ्ठल खंदारे, संतोष खंदारे, सुनिल वाघमारे, भारत कोरडे, रितेश कांबळे, निलेश चापके, गोविंदा कोरडे, हिरा कोरडे, नितीन गायकवाड, गजानन सुरोशे, प्रकाश गायकवाड, उत्तम येलतकर, संजयभाऊ चिंतामणी, नरेंद्र खंदारे, किरण कोरडे, संतोष पाटील, हनुमंत फुलसांगवे, पंजाब इटकरे, दीपक पदमे, प्रकाश खंदारे, मारोती गायकवाड इत्यादी मंडळी या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी प्रयत्न करीत आहेत.
