
हिमायतनगर| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आयोजित 20 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत आजादी की मशाल यात्रेचे आगमन हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयामध्ये दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी सकाळी ठीक:१०:०० वाजता झाले. विद्यापीठाच्या या मशाल रॅलीला पूर्वनियोजित ठिकाणाहून भारत माता की जय, वंदे मातरम् चे नारे देत महाविद्यालया पर्यंत सन्मानाने घेऊन जाण्यात आले.


तद्नंतर महाविद्यालयाच्या वतीने आजादी की मशाल यात्रेचे स्वागत पर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते ह्या लाभल्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आजादी की मशाल यात्रेचे विद्यापीठाचे प्रतिनिधि डॉ. पंजाब शेरे, डॉ. माधव जोशी, डॉ. व्यंकटेश मदनुरे, डॉ. प्रकाश शिंदे आदी मंचावर उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी रामानंद तीर्थ व वीर हुतात्मा जयवंतराव पाटील (वायपणेकर) यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून मशाल यात्रेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे व प्राध्यापक मान्यवर प्रतिनिधींचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मशाल यात्रेचा उद्देश व भूमिका विशद करण्यासाठी प्रा. डॉ. प्रकाश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तरनंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांनी आजादी की मशाल यात्रा चे स्वागत पर मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. शेवटी आजादी की मशाल यात्रेचे प्रतिनिधी डॉ. पंजाब शेरे यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थितांना शपथ देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. तर आभार स्टॉप सेक्रेटरी प्रा. डॉ. डि. के. कदम यांनी मानले.


या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक प्रा. डॉ. दिलीप माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सविता बोंढारे तसेच महाविद्यालयाचा संपूर्ण प्राध्यापक वर्ग व कार्यालयीन कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आदी नी परिश्रम घेतले. तसेच या मशाल यात्रेसाठी हिमायतनगर येथील पोलीस स्टेशन चे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयाचा संपूर्ण स्टॉप कार्यालयीन कर्मचारी तसेच संपूर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
