Saturday, January 28, 2023
Home नांदेड औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रियेत सुक्ष्म निरीक्षकांचे पहिले प्रशिक्षण संपन्न -NNL

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रियेत सुक्ष्म निरीक्षकांचे पहिले प्रशिक्षण संपन्न -NNL

फिरते पथक व व्हिडीओ देखरेख पथकाला विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार प्रदान

by nandednewslive
0 comment

नांदेड| औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी नांदेड जिल्ह्यासाठी जिल्ह्यातील 30 मतदान केंद्रावर होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेतील नवे बदल लक्षात घेऊन निवडणूक प्रक्रिया विहित पद्धतीने अधिकाधिक पारदर्शक होईल यादृष्टीने कामकाज करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी दिले.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या कार्यपद्धतीबाबत सुक्ष्म निरीक्षकांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात पहिले प्रशिक्षण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संतोषी देवकुळे, निवडणूक कामकाजासाठी नियुक्त सुक्ष्म निरीक्षकांची उपस्थिती होती.

या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात 7 हजार 83 पुरुष मतदार तर 1 हजार 884 महिला मतदार असे एकुण 8 हजार 967 मतदार आहेत. सुक्ष्म निरीक्षकांना निवडणूक आयोगानी दिलेल्या कार्यपद्धतीनुसार कामकाज करावयाचे आहे. सुक्ष्म निरीक्षकांनी मतदान केंद्रावरील सर्व बाबींचे निरीक्षण करावे. कुठे चुकीचे मतदान होणार नाही, मतदार यादीतील एखादा मतदार मयत आहे का याची खात्री करणे, मतदानाची वेळ, मतदानाची दर दोन तासाला आकडेवारी नोंदवण्याची अचूक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. निवडणूक साहित्य हाताळण्याबाबत माहिती यावेळी दिली.

फिरते पथक व व्हिडीओ देखरेख पथकाला विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार प्रदान
05-औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 अनुषंगाने नियुक्त केलेले फिरते पथक व व्हिडीओ देखरेख पथकाला शासनाने 11 जानेवारी 2023 रोजीच्या अधिसूचनेद्वारे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 21 नुसार विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित केले आहे. या संहितेचे कलम 129, 133, 143 व 144 खालील अधिकार प्रदान केले आहेत.

banner

याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) कलम 21 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश निर्गमीत केले आहेत. या आदेशासोबत संलग्न केलेल्या यादीनुसार निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले फिरते पथक संख्या-32 व व्हिडिओ देखरेख पथक संख्या-32 यांना निवडणूक कालावधीपर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

अशाप्रकारे नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना संहितेचे कलम 129, 133, 143 व 144 खालील अधिकार प्रदान केले आहेत. हे आदेश पुर्वलक्षी प्रभावाने अधिसुचना प्रसिद्ध झालेला दिनांक 11 जानेवारी 2023 पासून अंमलात राहतील, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!