नवीन नांदेड। मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती सिडकोच्या अध्यक्षपदी मराठा सेवा संघ सिडकोचे सचिव सुभाष सुर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विनय गिरडे,मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक सोपानराव पांडे, संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव गाडे, पत्रकार डिगा पाटील, पत्रकार तिरुपती घोगरे,युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव सतीश बस्वदे,मराठा सेवा संघाचे सिडको अध्यक्ष त्र्यंबक कदम,ना ही उमाटे,उत्तम जाधव,दिपक भरकड, गजानन पवार, रावसाहेब झुंबाडे,कोंडिबा घोरबांड, बालाजी हिवराळे,एकनाथ पाटील आदिंची यावेळी उपस्थिती होती.
उर्वरित शिवजन्मोत्सव समिती कार्यकारिणी २३ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. सुभाष सुर्यवंशी यांच्यी अध्यक्षपदी निवड झाल्या बदल अभिनंदन होत आहे.