
हिमायतनगर| शहर व ग्रामीण भागातील महिला मुलींच्या सुरक्षिततेसाठी हिमायतनगर पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना रोडरोमिओ, टवाळखोर त्रास देत असतील तर आई-वडिलांना पोलिसांना माहिती द्यावी. संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. यासाठी ११२ नंबरवर फोन करावा किंवा पोलीस अधिकाऱ्यांना फोन करावा असे आवाहन हिमायतनगर पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. महिला व मुलींच्या बाबतीत गैरवर्तन कराल तर टवाळखोऱ्यांनो सावधान व्हा अन्यथा पोलीस कोठडीत जावे लागेल असाच संदेश या पत्रकातून मिळतो आहे. यामुळे हिमायतनगर पोलीस ऍक्शन मोडवर आली असल्याचे बोलले जात आहे.


हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात गेल्या अनेक दिवसापासून शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना रोड रोमिओच्या त्रासाचा सामना करावा लागतो आहे. काही धनदांडग्यांची अल्पवयीन युवकही धूम गतीने वाहने चालवून अपघाताला निमंत्रण देत असल्याचे समोर आले आहे. अश्याच लपवाईन युवकाच्या दुचाकी अपघातांना एकच मृत्यू झाल्याहची घटना नुकतीच घडली आहे. तेंव्हापासून हिमायतनगर पोलीस ऍक्शन मोडवर आली असून, यापासून मुलींना सुरक्षा मिळण्यासाठी आणि अल्पवयीन मुलांच्या हातून गुन्हे घडणार नाहीत यासाठी विशेष मोहीम राबविली जात असल्याचे पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर यांनी सांगितले आहे.


हिमायतनगर पोलीस मोहीम सुरू केली असून, या मोहिमे अंतर्गत हिमायतनगर शहरातील शाळा, कॉलेज, मंदिर आणि खाजगी शिकवणी परिसरात ये-जा करणाऱ्या महिला, मुलींना रोडरोमिओ, टवाळखोर कडून त्रास होणार नाही यासाठी पोलीस पथक भेट देत आहेत. या सर्व घटनांना आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासन २४ तास आपल्या सेवेत हजर राहणार आहेत. यासाठी नागरिकांनी दिलेल्या माहितीची गोपनीयता आपत्कालीन नंबर ११२ वर संपर्क करून माहिती द्यावी घटनेचे गांभीर्य लक्षात ठेवून संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


यासाठी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.डी.भूसनूर यांचा संपर्क क्रमांक- ९८३४७७४७९९, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन संपर्क ९६८९७०७०३८, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी संपर्क ९७६४१२३०१८, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के.बी.कागणे यांचा संपर्क क्रमांक ९९२१६२३३३३ यावर तक्रार अथवा माहिती नोंदवावी. असे आवाहन हिमायतनगर पोलीसाकडून करण्यात आले आहे. हिमायतनगर पोलिसांनी सुरु केलेल्या या मोहिमेचे शहरातील नागरिकांतुन कौतुक केले जात आहे.
