
नविन नांदेड। हडको येथील श्री शनिदेव व श्री संकट मोचन हनुमान मंदिर देवस्थान श्री शनिदेव येथे शनि अमावास्या व दर्श पर्व काळ योग निमित्त दि.२१ जानेवारी रोजी सकाळी महाअभिषेकासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी भाविकभक्तांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे, भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या सह विविध क्षेत्रातील राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व भाविक भक्तांनी दर्शन घेतले.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देवस्थान मंदिरात शनिदेव जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता.सकाळीशनिदेवतेचा ५१ किलो तेलाचा सामुदायिक अभिषेक गुरु शशिकांत कुलकर्णी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विश्वस्त मंडळ न ऊपसिथी होती ,यावेळी शनिदेव जयंती निमित्ताने गजानन लोंढे,करणसिंह ठाकूर, यांच्या तर्फे प्रसादाचे वाटव करण्यात आले होते, शनि अमावास्या निमित्ताने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी विधीवत पूजा केली.


यावेळी विश्वस्त मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले,तर दर्शनासाठी भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे, सिडको भाजपा मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख, विविध राजकीय पदाधिकारी , पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, हा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष करणसिंह ठाकूर, माधवराव कदम, गोपीनाथ कहाळेकर, संजय जाधव, किशनराव रामपल्ली, बाळासाहेब चव्हाण, त्र्यंबक सरोदे, दत्तात्रय सागुरे, शिवाजी पाटील आढाव, प्रा.अशोक मोरे,देवबा कुंचेलीकर, निवृत्तीराव जिंकलवाड, खुशाल कदम, यांनी परिश्रम घेतले.
