Tuesday, February 7, 2023
Home क्राईम नरसी रोडवर असलेल्या गुरमीत हाँटेलमध्ये कालबाह्य झालेली बियर विक्री करण्यात आल्याची घटना -NNL

नरसी रोडवर असलेल्या गुरमीत हाँटेलमध्ये कालबाह्य झालेली बियर विक्री करण्यात आल्याची घटना -NNL

by nandednewslive
0 comment

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। हप्ते वसूलीत मग्न असलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात कालबा उत्तमह्य झालेले मद्य विक्री होत असल्याची कसलीच माहिती नाही. पण एका जागरूक नागरिकाच्या जागरुकतेमुळे नायगाव नरसी रोडवर असलेल्या गुरमीत हाँटेलमध्ये कालबाह्य झालेली बियर विक्री करण्यात आल्याची घटना चव्हाट्यावर आली असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करण्यात आली असली तरी भ्रष्टाचारात अखंड बुडालेले अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

नायगाव पासून तीन कि.मी. अंतरावर नरसी रोडवर गुरुमीत बियर बार असून या बारमधून विरेंद्र डोंगरे यांनी जानेवारी २०२३ रोजी हेवर्ड ५००० हि बियर २०० रुपयाला खरेदी केली. सहज उत्सुकता म्हणून खरेदी केलेल्या बियरवरील तारीख पाहिली असता त्यावर (ता.१९.०४.२०२२ ते १८.१०.२०२२) असा वैध कालावधी होता. म्हणजे (ता. १९) एप्रिल २०२२ रोजी तयार झालेली बियर (ता. १८) आक्टोबर २०२२ पर्यंत वैध होती. सदरची बियर पिण्यासाठी सहा महिणेच वैध असल्याचे बाँटलीवरील स्टिकरवरुन दिसून आले.

परंतु गुरमीत हॉटेलने (ता. १८) आक्टोबर २०२२ रोजी कालबाह्य झालेली बियर (ता. ०४) २०२३ रोजी विक्री केली. तबल ७८ दिवसापूर्वी कालबाह्य झालेली बियर विक्री करून तक्रारदाराचे आर्थिक शोषण तर केलेच पण कालबाह्य बियर देऊन शारीरिक इजा पोहचण्याचा प्रयत्न करणेत आला आला असल्याचे नमूद केले आहे.

सहज तारीख पाहण्याची सुदबुद्धी सुचल्याने कालबाह्य झालेली बियर निघाली. त्यामुळे तक्रारदाराने बियरचे घोट रिचवले नाहीत. तसे झाले असते तर शरीराला हानिकारक झाले असते. गुरमीत बियर बार हे संगणकीकृत असल्याने आलेला, विक्री झालेला, शिल्लक असलेला आणि कालबाह्य झालेल्या मद्य साठ्याची नोंद असणे बांधणकारक होते.

banner

ती असेलही पण कालबाह्य माल विक्री करुन जाणीवपूर्वक ग्राहकांचे जीवितासोबत खेळत आहेत असा तक्रारीत आरोप करण्यात आला असून. गुरमीत हॉटेलचे परवाना रद्द करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विरेंद्र रावण डोंगरे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!