नांदेड| दूरदर्शन कुठलीही बातमी लिहितांना घाई करत नाही त्यामुळे आम्ही श्रोत्यांकडे अचूक बातमी पोहचवितो. या क्षेत्रात येवू ईच्छिणार्या ठावी पत्रकारांनी विश्वास संपादन करणारी अचूक बातमी देण्यासाठी नेहमी प्रयत्नशिल असावे असे प्रतिपादन मुंबई दूरदर्शन केंद्राचे उपसंचालक डॉ.नरेंद्रकुमार विसपुते यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मुंबई दूरदर्शन केंद्राचे डॉ.नरेंद्रकुमार विसपुते म्हणाले की, कितीही चॅनल्स आले तरी प्रत्येकाचे अस्तित्व वेगळे आहे. डिजीटल मिडीयाच्या युगात नवीन तंत्रज्ञानामुळे क्रांती झाली. त्यावेळी दूरदर्शन वाहिनी बंद पडेल अनेकांनी तर्क लावला होता. परंतू विविध वृत्तवाहिन्या या क्षेत्रात येवून त्या प्रत्येकाचे वेगळे अस्तित्व कायम आहे. वृत्तपत्र क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. आज गुगलच्या माध्यमातून आपल्याला नविन चॅनल्स उघडता येते, पोर्टल, युट्यूब एवढेच काय कुणाच्या जिवनचरित्रावर आपण वेगळी माहिती प्रसिध्द करू शकतो परंतू हे करीत असतांना विद्यार्थ्यांनी आपले क्षेत्र निवडले पाहिजे ज्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे त्यांनी त्या क्षेत्राचा अभ्यास आत्मसात करावा. ज्यांना इलेक्ट्रॉनिक्स मिडीयामध्ये नविन काही करायचे आहे त्यांनी वेगळा घटक निवडावा त्या दृष्टीने कार्य करावे.
हे करीत असतांना बातमी द्यायची आहे म्हणून घाई गडबडीत कुठलीही बातमी देवू नये. अनेक वेळा त्या बातमीचा विपरीत परिणाम होतो. या संदर्भात उदाहरण देतांना विसपुते म्हणाले मी दूरदर्शनला असतांना एका ठिकाणी अपघात घडला होता. अनेक माध्यमांमध्ये कुंभमेळ्यात 22 जण चेंगराचेंगरीत ठार झाले असे दाखविले जात होते परंतू आमच्या प्रतिनिधींनी यातील अचूक आकडा सांगितला. वास्तविक पाहता 22 जणांचा त्यात मृत्यू झाला नव्हता असे त्यांनी उदाहरण देवून सांगून बातमी उशिरा द्यावी परंतू अचूक द्यायला हवी. दूरदर्शन अचूक बातम्या देते आम्ही विविध प्रकारची सदरे चालवितो ते अभ्यासपूर्ण असतात त्याचा फायदा या क्षेत्रात येवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच होत आहे. कारण शासनाने दिलेल्या अचूक आकडेवारीवर आमची पत्रकारीता असते. हे विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन महात्मा गांधी मिशन संचलीत पत्रकारिता व माध्यमशास्त्र महाविद्यालयाच्यावतीने दि.20 जानेवारी रोजी आयोजित केली होती. यावेळी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मुंबई दूरदर्शन केंद्राचे उपसंचालक डॉ.नरेंद्रकुमार विसपुते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यीक देवीदास फुलारी तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई दूरदर्शन केंद्राचे उपसंचालक डॉ. नरेंद्रकुमार विसपुते, एबीपी माझा मुंबई येथील निवेदिका वृषाली यादव-सारंग, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, स्वारातीम विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मुंबई दूरदर्शन केंद्राचे डॉ.नरेंद्रकुमार विसपुते म्हणाले की, कितीही चॅनल्स आले तरी प्रत्येकाचे अस्तित्व वेगळे आहे. डिजीटल मिडीयाच्या युगात नवीन तंत्रज्ञानामुळे क्रांती झाली. त्यावेळी दूरदर्शन वाहिनी बंद पडेल अनेकांनी तर्क लावला होता. परंतू विविध वृत्तवाहिन्या या क्षेत्रात येवून त्या प्रत्येकाचे वेगळे अस्तित्व कायम आहे. वृत्तपत्र क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. आज गुगलच्या माध्यमातून आपल्याला नविन चॅनल्स उघडता येते, पोर्टल, युट्यूब एवढेच काय कुणाच्या जिवनचरित्रावर आपण वेगळी माहिती प्रसिध्द करू शकतो परंतू हे करीत असतांना विद्यार्थ्यांनी आपले क्षेत्र निवडले पाहिजे ज्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे त्यांनी त्या क्षेत्राचा अभ्यास आत्मसात करावा.
ज्यांना इलेक्ट्रॉनिक्स मिडीयामध्ये नविन काही करायचे आहे त्यांनी वेगळा घटक निवडावा त्या दृष्टीने कार्य करावे. हे करीत असतांना बातमी द्यायची आहे म्हणून घाई गडबडीत कुठलीही बातमी देवू नये. अनेक वेळा त्या बातमीचा विपरीत परिणाम होतो. या संदर्भात उदाहरण देतांना विसपुते म्हणाले मी दूरदर्शनला असतांना एका ठिकाणी अपघात घडला होता. अनेक माध्यमांमध्ये कुंभमेळ्यात 22 जण चेंगराचेंगरीत ठार झाले असे दाखविले जात होते परंतू आमच्या प्रतिनिधींनी यातील अचूक आकडा सांगितला. वास्तविक पाहता 22 जणांचा त्यात मृत्यू झाला नव्हता असे त्यांनी उदाहरण देवून सांगून बातमी उशिरा द्यावी परंतू अचूक द्यायला हवी. दूरदर्शन अचूक बातम्या देते आम्ही विविध प्रकारची सदरे चालवितो ते अभ्यासपूर्ण असतात त्याचा फायदा या क्षेत्रात येवू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच होत आहे. कारण शासनाने दिलेल्या अचूक आकडेवारीवर आमची पत्रकारीता असते. हे विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले की, प्रेस आणि पोलीस ही दोन माध्यमे समाजाला न्याय देऊ शकतात. समाजात जे चुकीचे चालले आहे, ते थांबविण्याचे काम किंवा थेट कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. ते आम्ही काम सजकपणे करतो. परंतु अनेकवेळा बातमीची शहानिशा न होता, अनेकवेळा प्रसिद्ध दिली जाते. त्यामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त होऊ शकते, त्यामुळे पत्रकारांनी बातमीची पडताळणी करून तिला प्रसिद्धी द्यायला हवी.
एक उदाहरण देताना ते म्हणाले की, एका महिलेने पोलीस स्थानकासमोर गुन्हा दाखल होत नसल्याने विचित्र स्वरूपात वर्तन करत होती, त्या बाबीची पडताळणी केल्यानंतर ती महिला मानसिक रूग्ण असल्याचे समजले. परंतु बातमी प्रसिद्ध झाली की, पोलिसांनी त्या महिलेचा गुन्हा दाखल केला नाही, असे उदाहरण त्यांनी सांगत बातमीची विश्वासहर्ता आणि त्याचा परिणाम उदाहरणाच्या माध्यमातून नवोदित पत्रकारांना दिला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी म्हणाले की, 2002पासून पत्रकारिता महाविद्यालय अस्तित्वात आहे. बी.जे., एम.जे. असे या ठिकाणी अभ्यासक्रम असून 120 विद्यार्थी चालू वर्षांत शिक्षण घेत आहेत. एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल नॉलेज कळावे हा हेतू आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी माध्यमशास्त्राचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी मनोगतात पत्रकारितेचा उगम व स्वातंत्र्य लढ्यात पत्रकारितेचे योगदान यावर मत व्यक्त केले. ते म्हणाले की, भारत देश स्वातंत्र्य होण्यासाठी वृत्तपत्रांनी प्रभावीपणे भुमिका निभावली. ब्रिटीशांनी आपल्यावर 150 वर्षे राज्य केले. त्या माध्यमातून आपल्याकडे विकास झाला. त्यानंतर ब्रिटीश राजवट घालविण्यासाठी भाऊ महाजन, विष्णु शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, लाल राजपत राय, सपे्र यांनी तत्कालीन परिस्थितीविरूद्ध बंड पुकारले.
त्यामुळे स्वातंत्र्य मिळाले. तर इकडे सामाजिक गुलामगिरी दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक व इतर दैनिके काढून समाज गुलामीतून मुक्त होण्यासाठी कार्य केले. याचदरम्यान मराठवाडा निजामाच्या राजवटीत होता, जो कोणी निजामाच्याविरूद्ध बोलले त्याविरूद्ध लिखाण करेल त्याला कडक शिक्षा व्हायची. हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये शोएब उल्ला खान यांनी निजामाविरूद्ध लिखाण करून सक्षम पत्रकारिता केली. सामाजिक स्वातंत्र्याचा लढा राजाराम मोहन राय, महात्मा फुले, ताराबाई शिंदे यांनी लढल्याचे त्यांनी सांगितले.
या पहिल्या सत्रामध्ये उद्घाटनीय कार्यक्रमात निवेदिका वृषाली यादव-सारंग म्हणाल्या की, पत्रकारितेचे बदलचे स्वरूप लक्षात घेता स्वतःला आपण बदलले पाहिजे. बातमी कधीही पूर्ण होत नसते. सकाळी आलेली अपडेट संध्याकाळपर्यंत तिची संपूर्ण माहिती मिळते. आजकाल बातमीसाठी ट्रोल होण्याचा प्रकार वाढला आहे. तो या माध्यमांसाठी चुकीचे असल्याचे सांगून ध्येय ठेऊन पत्रकारिता केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ज्येष्ठ साहित्यीक देवीदास फुलारी म्हणाले की, सामाजिक रूची बदलत असल्यामुळे प्रसारमाध्यमांची भुमिका बदलली दिसते. त्यामुळे आपण बदलायला हवे, असे म्हणत ते म्हणाले की, प्रिंट मीडिया कधीही धोक्यात येऊ शकत नाही. पत्रकारांनी पत्रकार होण्यापूर्वी साहित्यीक झाले तर अधिक प्रभावी बातमी लिहू शकतात, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रमोद देशमुख, दीपक मारताळे, अॅड. उदय संघारेड्डीकर, शंकर वाडेवाले, डॉ. गोविंद हंबर्डे, प्रा. सुहास पाठक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या परिषदेस ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, प्रविण खंदारे, प्रशांत गवळे, सुरेश आंबटवार, शरद काटकर, शिवाजी शिंदे, किरण वाठोरे, गोविंद हिवरे, साहेबराव गजभारे, श्रीधर नागापूरकर, भूषण जोशी आदी उपस्थित होते. एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेत अनेक जणांनी शोधनिबंध सादर केेले होते. या शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. गणेश जोशी, डॉ. प्रविणकुमार सेलूकर, प्रा. राज गायकवाड, प्रा. सुरभी जैन, दिशा कांबळे यांनी परिश्रम घेतले. विविध सत्रामध्ये राज्यस्तरीय परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषीकेश कोंडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राज गायकवाड यांनी मानले.