अर्धापूर,निळकंठ मदने। तालुक्यातील कोंढा येथील शेतकरी कुटुंबातील दिलीप जोगदंड यांच्या मुलींनी प्रेरणा घेऊन अमेरिकेत शिक्षण घेऊन यशस्वी विमान उडविले,ती विमान सेवेत दाखल झाल्याने कोंढ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा बसल्याने कोंढा गाव चर्चेत आले आहे.
अर्धापूर तालुक्यातील कोंढा गाव शेतकरी चळवळीसाठी, लग्नाचा मेळावा वेळेवरच लावण्यासाठी गेल्या २५ वर्षापासून प्रसिद्ध आहे, गावकऱ्यांची एकजूट,मारोती मंदिरासमोर घंटा वाजवून गावकरी विनाविलंब मंदिरासमोर गोळा होतात, येथील एका भावाने बहिनीची वरात थेट हेलिकॉप्टर मधून काढली,येथील भुमीपुत्र पत्रकार ही मुंबई वृतवाहिनीत काम करतात.
यासह आदिमुळे कोंढा गाव चर्चेत असते, येथील शेतकरी केशवराव बालाजी जोगदंड यांचे चिरंजीव २२ वर्षांपूर्वी अमेरीकेत जाऊन स्थायिक झाले, त्यांनी अमेरिकेत विमानसेवेत यशस्वी काम केले. त्यांची प्रेरणा घेऊन त्यांची मुलगी रेवा दिलीप जोगदंड हिने अमेरिकेत एअरफोर्स प्लाइंट कमांडर म्हणून रुजू झाली,तिचे विमान चालवून पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण झाले, जोगदंड परीवार जरी अमेरीकेत स्थाईक झाले असले तरी कोंढा गाव व अर्धापूर तालुक्याशी जोगदंड परीवाराची नाळ जोडलेली आहे,त्यामुळे रेवा जोगदंडच्या यशाने कोंढावासीयांना समाधान मिळाले आहे.