Tuesday, February 7, 2023
Home नांदेड नांदेड -मुंबई व्हाया हिंगोली अकोला नवीन रेल्वे धावणार: खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नांना पुन्हा यश -NNL

नांदेड -मुंबई व्हाया हिंगोली अकोला नवीन रेल्वे धावणार: खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नांना पुन्हा यश -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| नांदेडसह मराठवाडा आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांना रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा त्यांना अधिकाधिक रेल्वेच्या शिवाय उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला पुन्हा यश आले असून आता नांदेड – मुंबई व्हाया हिंगोली अकोला ही नवीन रेल्वे धावणार आहे.

मराठवाड्यातील रेल्वेचे प्रश्न मार्गी लावत असताना रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. नांदेडसह मराठवाडा आणि विदर्भातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारे येणाऱ्या प्रवाशांना अधिकाधिक रेल्वे उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी वारंवार केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली आहे .

या अनुषंगाने आता दर सोमवारी आणि बुधवारी नांदेड- मुंबई व्हाया हिंगोली- अकोला -भुसावळ -मनमाड ही नवीन रेल्वे सुरू होणार आहे. नांदेड येथून रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटाला निघणारी रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता मुंबई येथे पोहोचणार आहे. या रेल्वेचा निश्चितपणे नांदेड आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होईल असा विश्वास खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!