
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। दिवाणी व फौजदारी न्यायालय नायगावच्या वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.निलेश देशपांडे तर सचिवपदी ॲड.साईनाथ पाटील कवळे सोमठाणकर हे बहुमताने विजयी झाले असून नायगाव वकील संघाच्या सन २०२३ साठी पार पडलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या निवडणुकीत जेष्ठ विधींतज्ञ ॲड.नारायणराव लंगडापुरे यांच्या पॅनलचे अध्यक्ष पदासाठी ॲड. निलेश देशपांडे व साईनाथ कवळे हे बहुमताने विजयी झाले आहे.


नायगाव अभिवक्ता महासंघाच्या अध्यक्ष व सचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. निलेश देशपांडे यांना १४ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी ॲड. बी.एम. वाघमारे यांना ९ मते मिळाली.तर ॲड. निलेश देशपांडे यांचा ५ मतांनी दणदणीत विजय झाला. सचिव पदासाठी ॲड.साईनाथ पाटील कवळे यांना १५ मते तर प्रतिस्पर्धी ॲड.एस.बी.कुलकर्णी यांना ८ मते पडली.तर ॲड. साईनाथ पा.कवळे यांचा ७ मतांनी दणदणीत विजय झाला असून ॲड.बी.एम.वाघमारे व ॲड.एस.बी.कुलकर्णी यांचा या निवडणुकीत दारून पराभव झाला.


निवडणूक निकालानंतर सर्व वकिलांनी विजयी जल्लोष साजरा केला. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जेष्ठ विधितज्ञ ॲड. के.आर.पाटील सुजलेगावंकर यांनी काम पाहिले तर. या निवडणुकीत ॲड.एस.बी.कदम सोमठाणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


या विजयी जल्लोषाप्रसंगी ॲड. के.आर.पाटील , ॲड.एन.एस.लंगडापुरे , ॲड.यु.जी. मेगदे , ॲड.यु.जी. कांगठीकर , ॲड.यु.बी.बिलोलीकर, ॲड.एस.बी. इंगोले, ॲड.सौ.एस.जी.कोकणे ,ॲड.एस.एन.जाधव , ॲड.एल.एस. तुमेदवार , ॲड.एस.बी.कदम सोमठाणकर ,ॲड.ए.एम.निलंगेकर ,ॲड.बी.बी. जाधव , ॲड.सी.एम. वजीरगांवकर ,ॲड.जी.पी. कवळे ,ॲड.आर.एल.एकलारे ,ॲड.के.जी.शिनगारे बिजुरकर , ॲड.जे.आय.जावेद , ॲड.एस.एन.मांजरमकर ,ॲड.एस.एस. गोपछडे , ॲड.डी.एम.कुलकर्णी आदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष ,सचिव यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
