Saturday, January 28, 2023
Home नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी संतोष पांडागळे -NNL

जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी संतोष पांडागळे -NNL

by nandednewslive
0 comment

मुंबई| नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक श्री. संतोष पांडागळे यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज केली आहे. पुढील दोन वर्षांसाठी ही नियुक्ती राहणार आहे.

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि महानगर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची घोषणा उद्या करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांनी संतोष पांडागळे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडी बद्दल पांडागळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या निवडीबदल संतोष पांडागळे यांनी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलींद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूर खान, कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी, माजी विभागीय सचिव प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप नागापूरकर, आदींचे आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!