नांदेड| सोलापूर विभागातील कोपरगाव ते कान्हेरगाव दरम्यान दुहेरीकरण चे कार्य पूर्ण करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे –
रद्द करण्यात आलेल्या गाड्या :गाडी क्रमांक 11409 दौंड ते निझामाबाद डेमू दिनांक 20 जानेवारी ते 28 जानेवारी, 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 11410 निझामाबाद ते पुणे डेमू दिनांक 22 जानेवारी ते 30 जानेवारी, 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
उद्या दिनांक 21 जानेवारी, 2023 ला निझामाबाद येथून सुटणारी गाडी संख्या 01413 निझामाबाद- पंढरपूर डेमू विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे.