
अर्धापूर। विविध क्षेत्रात लागलेली स्पर्धा,नौकरदारांना जबाबदारीची चिंता, विद्यार्थ्यांना अभ्यासाची चिंता, राजकारणातील अनिश्चितता,एकमेकांशी असलेली चढाओढ यामध्ये नेहमी मनुष्य अशांत व असमाधानी असते,फक्त सांप्रदायिक क्षेत्रातच मनाला शांती व समाधान प्राप्त होते असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी केले.


अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथे हभप हरिनाम सप्ताहाचे गावकऱ्यांनी आयोजन केले होते, यावेळी भागवताचार्य हभप बाबूराव भांगे महाराज पार्डीकर तर काल्याचे किर्तनकार हभप महंत संतोष महाराज पुरी चोळाखेकर, किर्तनकार हभप भुजंग सितापराव रोडगीकर, हभप अदिनाथ मुळे लोणकर, विनोदसम्राट हभप विठ्ठल क्षीरसागर बेलसरकर,हभप दतात्रय कुरुंदेकर, हभप नारायण महाराज बीडकर,हभप पुनमताई आळंदीकर हभप शिवाजी कल्याणकर पिंपळगावकर (म) यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गावकऱ्यांनी ग्राम स्वच्छता अभियान,काकडा,पंगत, प्रसादाचे आयोजन केले होते.यावेळी पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी गतवर्षी येथील सप्ताहास केलेल्या सहकार्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी अशोक जाधव म्हणाले कि,तरुण पीढी मोठ्या प्रमाणावर येथील सप्ताहास उपस्थित राहते,व गावातील राजकारणीही सप्ताहात प्रतिष्ठित नागरीकासह सक्रीय असतात हे मुख्य वैशिष्ट्य आहे,बाबूराव महाराज म्हणाले कि,गावातील युवकांनी व्यसनापासून मुक्त होऊन आई-वडीलांची जिवंतपणी सेवा करावी,त्यांचे पुण्य मिळते,भुजंग महाराज यांनी पहिल्या दिवशी किर्तनास प्रारंभ केला, विठ्ठल महाराज यांनी प्रमाणासह सर्वांना हसवून ठेवले, दत्तात्रेय महाराज यांनी कुरुंदा येथे मानधनाच्या पैशातून मंदिर उभारलेचे सांगीतले,काल्याचे किर्तन महंत संतोष गिरी यांनी सर्वाना मंत्रमुग्ध करुन विचारांची शिदोरी दिली.


यावेळी वरुडकर,उकृष्ठ भजनी कचरु गाढे भोगावकर, संतोष परांडे,केशव कंठाळे ,मृंदांगचार्य ईश्र्वर महाराज बिचकूले सावरगावकर,राजू महाराज गरड हिवरेकर, काकडा आरतीचे संभाजी माळवटा, पळसगावकर, केवळाजी ठोंबरे यांनी जबाबदारी पार पाडली, बालाजी डोईफोडे यांनी काल्याच्या किर्तनाची पंगत दिली,फेटे व नवीन वस्त्रासह गावात भव्य मिरवणूक सोहळा काढण्यात आला,महिलांनी गल्ल्यातून ६५ हजाराची वर्गणी दिली,हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी तरुणासह, महिला व गावकऱ्यांनी प्रयत्न केले.
