हिमायतनगर, दाऊ गाडगेवाड| देशाला स्वातंञ्य मिळून ७५ वर्षे झाले असून नुकताच देशाने आपला स्वातत्र्य अमृत महोत्सव मोठ्या थाटाने साजरा केला. परतु आजही जगाचा पोशिंदा समजल्या जाणारा बळीराजा अधिकारापासून वंचित राहत असून, त्यांच्या समस्येला प्रशासन दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.
अशीच घटना हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील शेतकरी असलेले नारायण रामजी बेंदरे हे शेतात धान्य पिकवून आपली व आपल्या परिवाराची उपजिविका भागवितात. शेतीला जोडधंदा म्हणुन गायीचे पालन-पोषण करून त्या गायीच्या दुधापासून मिळणारे उत्पन्न त्यांच्या परिवाराला आधार देत होते. नुकतेच पेरणीच्या हंगामाला सुरूवात झाल्याने ते आपल्या शेतात गायीला झाडाखाली बांधून त्यांच्यासह त्यांची पत्नी शेतात इतर कामे करत होती त्यावेळी अचानक मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला असता झाडाखाली बांधलेल्या गायीवर अचानक विज कोसळली आणि त्यात गायीचा जागीच अंत झाला.
हि घटना दि. ९/०६/२०२१ रोजी अंदाजे ३. ५० वाजता घडली. हि माहिती पळसपुर सज्जाचे तलाठी बोड्डेवाड साहेब, कोतवाल अनिल तालेवार, पशुवैद्यकिय अधिकारी सोनटक्के साहेबांना कळवली असता त्यांनी तात्काळ घटना स्थळी येऊन सदरील घटनेचा पंचनामा केला. तसेच पशुवैद्यकिय अधिकारी यांनी मयत गाईचे शवविच्छेदन करूण तलाठ्या मार्फत तहसिल कार्यालयाकडे दाखल करून सुद्धा तब्बल दोन वर्षापासून सानुग्रह अनुदान मिळाले नाही.
आपल्या मयत झालेल्या गायीची नुकसान भरपाई शासनाने मिळवून द्यावी यासाठी शेतकरी नारायण बेंदरे दोन वर्षापासून हिमायतनगर तहसिल कार्यालयाला चकरा मारत आहेत पण आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून त्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याने सदरील शेतकऱ्यावर प्रजासत्ताक दिनी तहसिल कार्यालया समोर अमरण उपोषणाला बसणार असल्याचे शेतकऱ्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याकडे जिल्हाधिकारी साहेब गाभीर्याने लक्ष देणार का.. ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
ही बाब लक्षात येताच २०२१ मधील विज पडुन मरण पावलेल्या पशु पालकांना मदत देण्यासाठी खासदार हेमंत पाटिल यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन या प्रकरणात अद्याप निधी प्राप्त झाला नाही असे कळविले आहे. आणि तात्काळ या शेतकऱ्यांना मयत जनावरांच्या सानुग्रह अनुदान देण्यासाठी निधी आहरीत करण्याची परवानगी मिळावी असे पत्र देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे म्हंटले आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी उपोषणाचा पवित्र घेणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा वाढली आहे.