
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा संचलित यमुनाबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळा नायगाव (बा) ता. नायगाव (खै) जि. नांदेड आनंद नगरी (खरी कमाई) या अंतर्गत दिनांक 21/01/2023… आनंद खाऊ बाजार भरवण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी के व्ही फाजगे सर होते फाजगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या खरी कमाई हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमाचे उद्घाटन दत्त ज्युनिअर कॉलेज नायगाव चेे प्राचार्य सूर्यवंशी सर, प्रमुख उपस्थितीती मध्ये घोगरे सर ,एकनाथ कल्याण सर व मुख्याध्यापिका सौ सुनंदा बाळासाहेब पांडे (शिराढोणकर) मॅडम तसेच यमुनाबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचा संपूर्ण स्टॉप उपस्थित होता….विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ करून त्याच्या विक्रीतून खरी कमाई केली.

