हिमायतनगर। शहरापासून तिन किलो मिटर अंतरावर असलेल्या मौजे कारला फाटा जवळ आज एक दुचाकी चालक अपघात होऊन पडला होता. याची माहिती मिळतात कारला येथील तंटा बुद्ध समितीचे अध्यक्ष डॉक्टर अब्दुल गप्पा यांनी सदर युवकाला वाचविण्यासाठी तातडीने पोलिसांना फोन करून 108 गाडी मागून रुग्णाला दाखल केले त्यामुळे जखमी युवकाचे प्राण वाचले आहेत.
आज सकाळी राजू पंडीत माझळकर हा युवक मोटार सायकल घसरून हिमायतनगर तालुक्यातील कारला फाटण्याची नजीक पडला होता. तेंव्हा बघ्याची खूप गर्दी जमा झाली होती, परंतू अपघातात पडलेल्या युवकाला कोणीच अधार देत नव्हते. तेव्हा कारला (पी) येथील डॉ. अब्दुल गफार कार्लेकर (तंटामुक्तीचे अध्यक्ष) यानी विलंब न करता त्या मुलाला आधार देऊन पोलिस स्टेशनेस पोलीस निरीक्षक- भुसनर यांना संपर्क करून अपघात झाल्याचे सांगुन तत्काळ 108 ला फोन करून मदत केली.
विना विलंब पोलिस गाडी व दवाखान्याची ॲम्बुलन्स आली. त्या युवकाच्या खिशातील रूपये सुरक्षित पोलिस निरीक्षक यांच्या हवाली केले, असता तंटामुकी अध्यक्ष – डॉ. गफार यांचे भुसनर साहेबांनी अभिनंदन केले. पो. नि. भुसनर, डॉ.गफार, अशोक संगणवाड (पो.ज .) अविनाश कुलकर्णी ड्रायव्हर व ॲम्बुलन्स वाले यानी मदत करून तत्काळ त्या युवकाला हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट केले आहे. तात्काळ युवकास मदत मिळुन उपचार झाल्याने युवकाचे प्राण वाचले आहेत, याकामी दत्ता चिंतलवाड, सुनील जाधव यांनीही मदत केली आहे.