
वडगाव /पोटा, पांडुरंग मिराशे। हिमायतनगर तालुक्यातील वडगाव फोटो परिसरातील अनेक ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी शुद्ध स्वच्छ आरोग्य पाणी पिण्यासाठी देण्याकरता मोठमोठे प्लांट उभारून त्यामध्ये आरो मशीन टाकले आहेत परंतु हे आरोग्य शुद्ध पिण्याचे पाणी योजना अल्प कालावधीत बंद पडून ती धुळखात पडून आहेत त्यांच्या दुरुस्ती करिता ग्रामपंचायत कार्यालय उदासीनता दाखवत असल्यामुळे नागरिकांचे शुद्ध पिण्याचे पाण्याचे स्वप्न हवेत विरघळल्याने सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत खेद व्यक्त करीत आहेत.


वडगाव परिसरातील पोटा बुद्रुक, टाकराळा बुद्रुक ,वडगाव खुर्द ,मोरगाव ,पारवा बुद्रुक, पारवा खुर्द ,पोटा तांडा ,कांडली बुद्रुक ,आधी ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये चौदावा व पंधरावा वित्त आयोगातून गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी अंदाजे दोन लाख ते चार लाख 25 हजार पर्यंतचे आरो प्लांट घेऊन नागरिकांच्या आरोग्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती पाच रुपये दराप्रमाणे वीस लिटर शुद्ध पाण्याची बॉटल गावातील नागरिकांना विक्री केली जात होती ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या आरोग्यांच्या काळजीपोटी या पाण्याचा वापर करीत होते.


त्यामुळे या माध्यमातूनही ग्रामपंचायत ना पाण्याचा चांगला माउजा मिळत असे तर काही ठिकाणी ग्रामपंचायती मार्फत आरो प्लांट चालवण्यासाठी इतर नागरिकामार्फत देऊन त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याचाही त्या नागरिकावर जबाबदारी त्यांनी घातली होती त्या माध्यमातून दिवसभरात चांगले उत्पादन मिळत होते आज मात्र बहुतांश ग्रामपंचायत मधील ही यंत्रणा अवघ्या काही कालावधीमध्ये बंद पडली असून लाखो रुपयाचे यंत्र धुळखात पडून आहेत. परंतु त्यांचा दुरुस्ती व देखभालीसाठी ग्रामपंचायत आता मात्र उदासीनता दाखवीत आहे.


त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना आरो प्लांटचे पाणी पिण्याची लागलेली सवय महागात पडत आहे कारण ग्रामपंचायतच्या आरो प्लांट बंद पडल्यामुळे खाजगी आरो प्लांट चालकाकडे वीस लिटर शुद्ध पाण्यासाठी दहा ते पंधरा रुपये नागरिकांना मोजावे लागत आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशांना मोठी झळ बसत आहे. तर अनेक नागरिकांचे शुद्ध पाणी पिण्याचे स्वप्न हवेतच विरघळत असल्याची खंत अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.

तालुका पंचायत समिती विभागाने व जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देऊन ज्या ज्या ग्रामपंचायत मध्ये आरो प्लांट बंद असतील अशा ग्रामपंचायतींची तातडीने चौकशी करून बंद अवस्थेत असलेले आरो प्लांट पुन्हा चालू करण्यासाठी सूचना द्याव्यात व नागरिकांच्या हितासाठी असलेला पिण्यांच्या शुद्ध पाण्याचे आरो प्लांट तातडीने दुरुस्त करून नागरिकांची शुद्ध पाण्यासाठी होणारी हेळसांड थांबवावी अशी ओरड सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.
