
बिलोली/नांदेड। बिलोली तालुक्याती ल कासराळी येथे अखंड हरिनाम सप्ताह व विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार ह भ प संजय महाराज हिवराळे आळंदी देवाची यांच्या रसाळ वाणीतुन श्रीमद् भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन महोत्सव आदी धार्मिक कार्यक्रमाचे विठ्ठलेश्वर भजनी मंडळी व समस्त गावकरी मंडळीच्या वतीने भव्य दिव्य प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.


या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 24 जानेवारी रोजी होणार असून या कार्यक्रमाची सांगता दिनांक 31 जानेवारी रोजी होणार आहे बिलोली तालुक्यातील कासराळी येथे गेल्या अनेक वर्षापासून हा धार्मिक उत्सव साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार ह भ प संजय महाराज हिवराळे (आळंदी देवाची) यांची श्रीमद् भागवत कथा 24 जानेवारीपासून सुरू होत आहे. सद्गुरु परमपूज्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने हा धार्मिक सोहळा साजरा केला जात आहे. दरम्यान आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची सेवा लाभणार आहे.


त्यात दिनांक 24 रोजी ह भ प महेश महाराज महाजन, दिनांक 25 ह भ प शंकर महाराज लोंढे, दिनांक 26 संत नामदेव महाराजांचे वंशज भ प ज्ञानेश्वर विष्णुदास महाराज नामदास , दिनांक 27 रोजी रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे पंढरपूरकर, दिनांक 28 रोजी ह भ प निरंजन भाईजी महाराज, दिनांक 29 रोजी ह भ प पांडुरंग शास्त्री शितोळे, दिनांक 30 रोजी ह भ प एकनाथ महाराज सांगोलेकर यांचे कीर्तन होणार असून दिनांक 31 जानेवारी रोजी ह भ प संजय महाराज हिवराळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होईल. याच धार्मिक कार्यक्रमात दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी आठ ते दहा या वेळात श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दिनांक 30 जानेवारी रोजी सायंकाळी चार ते साडेसहा वाजेपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रदक्षणा व भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.


ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे प्रमुख ह भ प ज्ञानेश्वर महाराज कोळेकर हे असून या सदर सप्ताह काळात श्रीमद्भागवत कथेला संगीत संयोजन आदिनाथ महाराज दरेकर, बुलबुल वादक नेताजी राखाडे, तबला वादक, ऋषिकेश पाटील बेळीकर, अॅक्टोपॅड. सुधीर चंद्रपूर, गायक परशुराम महाराज भाटापुरकर, झाकीदर्शन.गोपालजी परभणीकर, किर्तन सेवेसाठी गायक भागवत महाराज सांगळे, दत्ता महाराज निकम, गणपत पाटील तांदळीकर, आकाश पाटील तांदळीकर, निळकंठ पाटील तांदळीकर, शंकर पाटील मुगावकर, गोविंद महाराज तांदळीकर, भागवत तांदळीकर,मृदंग वादक, माऊली महाराज खोटे, ऋषिकेश बेळीकर, चोपदार छोटु पाटील चिंचाळकर सर्व धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नव तरूण मिञ मंडळ कासराळी, विठ्ठलेश्वर भजनी मंडळी व समस्त गावकरी मंडळीच्या वतीने जोरदार प्रयत्न केले जात आहेत. या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.
