
नांदेड| शहरातील नमस्कार चौकातील एका हॉटेलमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा वादपुन्हा एकदा उफाळून आला असून, एका युवकाने चक्क हॉटेल मालकाच्या पाठीमागे खंजीर घेऊन लागल्याचा ठरत आज शहरवासीयांनी पहिला आहे. यावेळी हॉटेल चालकाने जीव वाचवण्यासाठी जवळच्या पेट्रोलपंपाचे केबिन गाठवून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोराने पाठलाग करून त्याच्या पाठीवर खंजिराने वार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. यात सदरील हॉटेल चालक जखमी झाला असून, सदरील घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे.


नांदेड शहरातील शहरातील नमस्कार चौकात असलेल्या एम एच २६ हॉटेल चालकाचा व काही तरुणाचा दोन दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. तो वाद त्याचा ठिकाणी मिटविण्यात आला. परंत्तू पुन्हा शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास संबंधित तरुण पुन्हा हॉटेलमध्ये आला. आणि कालच्याच वाद उकरून काढून बोलू लागला. वाद वाढल्याने राग अनावर झाल्याने त्याने आपल्या जवळील खंजीर बाहेर काढला. यावेळी जिवाच्या भीतीने हॉटेल चालक रस्त्यावर पळत सुटला.


आणि आपला जीव वाचवण्यासाठी तो बाजूलाच असलेल्या माणिक पेट्रोल पंपाच्या कॅबिनमध्ये घुसला. त्या ठिकाणी झालेल्या दोघांच्या मारामारीत हॉटेल चालक जखमी झाला. हल्ला करून तो तरुण बसने फरार झाला आहे. जखमी झालेल्या हॉटेल मालकावर सध्या स्थितीला नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे, पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

