उस्माननगर, माणिक भिसे। नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा सहकोषाध्यक्ष पदी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे यांची निवड करण्यात आल्याचे एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
गणेश लोखंडे हे उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.मागील २० वर्षांपासून पत्रकार म्हणून दैनिक सकाळ साठी काम करत असताना पंचक्रोशीतील अनेक बातम्यांना प्राधान्य दिले आहे. उस्माननगर येथील पत्रकार सभागृहासाठी सतत पाठपुरावा करून भव्य इमारत उभी राहिली आहे.त्यांच्या पत्रकारीतेतील लिखाणाची दखल घेऊन त्यांना नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा सहकोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे कळविले आहे.
त्यांच्या या निवडी बद्दल विभागातील गणेश ढेपें , उत्तमराव पाटील ढेंपें , वसंत सिरसाठ ,संजय देशमुख , बालासाहेब शिंदे ,संजय ढेपें ,कृष्णा जोमेगावकर , संगमेश्वर बाचे ,संतोष कराळे ,दौलत पांडागळे ,व्ही.आर.शिंदे , बबलू शेख बारूळकर,,दिंगाबर तेलंग , विठ्ठल कतरे , प्रदीप देशमुख, माणिक भिसे , विठ्ठल ताटे पाटील, लक्ष्मण कांबळे,लक्ष्मण भिसे , देविदास डांगे, अमजदखान पठाण , संभाजी कांबळे, संभाजी काळम पाटील,शिवकांत डांगे ,शुभम डांगे, सुनील भुरे , यांच्या सह राजकीय सामाजिक, शैक्षणिक सर्वक्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.